Aryan Khan Drug Case | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ‘एवढे’ दिवस राहणार एनसीबीच्या कोठडीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एनसीबीने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अलिशान क्रूझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा (Aryan Khan Drug Case) पर्दाफाश केला होता. यामध्ये बॉलिवूड किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drug Case) याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनला अटक केल्यानंतर त्याला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीनं 13 ऑक्टोबर पर्यंत कस्टडी (NCB Custody) मागितली होती. मात्र, कोर्टाने 7 ऑक्टोबर पर्यंत आर्यनची एनसीबीला कस्टडी दिली आहे. त्यामुळे आर्यनला आणखी तीन दिवस कस्टडीत काढावे लागणार आहेत.

NCB च्या वकिलांचा युक्तीवाद

 

एनसीबीच्या वतीने अ‍ॅड. अनिल सिंह (Adv. Anil Singh) युक्तीवाद करत आहेत क्रूझवरुन अटक करण्यात आलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना 9 दिवसांची एनसीबी कोठडी (ncb custody) देण्याची मागणी त्यांनी केली. आर्यनच्या फोनमधून आक्षेपार्ह बाबी हाती लागल्या असल्याचेही सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. आर्यनच्या फोनमध्ये सापडेलेले काही फोटो आक्षेपार्ह आहेत. आर्यनच्या फोन मध्ये सापडलेल्या लिंक्स आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करांशी संबंधित (accused connection with foreign drugs smuggler) असल्याचा दावा अनिल सिंह यांनी केला आहे.

आर्यनच्या फोनमधील चॅटमध्ये काही कोडनेम आढळून आले आहेत. त्यांचा उलगडा करण्यासाठी त्याची कोठडी मिळावी. मोबाईल मध्ये सापडलेल्या लिंक्स आणि त्यामागचं रॅकेट उजेडात आणण्यासाठी कोठडी गरजेची आहे. ड्रग्स तस्करांशी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून आपत्तीजनक चॅट करण्यात आलं आहे. या प्रकरणातही (Aryan Khan Drug Case) छापेमारी सुरु असल्याची माहिती सिंह यांनी न्यायालयाला दिली. याशिवाय आर्यनच्या चॅट मधून पैशांचा व्यवहार झाल्याचे समोर आलं आहे. बँक व्यवहारांसाठी रोख रकमेची मागणी करण्यात अल्याचा उल्लेक आर्यनच्या चॅटमध्ये असल्याचे सिंह यांनी सांगितले.

Web Title :- Aryan Khan Drug Case | Shah Rukh Khan’s son Aryan Khan will stay in NCB custody for three days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘…तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही’ – ठाकरे सरकारला फडणवीसांचा इशारा

Eknath Khadse | एकनाथ खडसे यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘भाजपमध्ये कोण कोण गद्दार आहेत हे राष्ट्रवादीत…’

Italy Plane Crash | मोठी दुर्घटना ! विमानाची इमारतीला धडक; एका चिमुकल्यासह 8 जण ठार