Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामीन आदेशाची कॉपी जारी; जाणून घ्या काय आहेत ‘बेल’च्या अटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रूझ ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. 25 दिवसांनी आर्यन खानसह तिघांची आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail mumbai) सुटका करण्यात आली आहे. मुंबई हाय कोर्टाने (Bombay High Court) आर्यनला अटी शर्तींसह 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर (Bail granted) केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने (NCB) मुंबईकडून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापेमारी करुन आर्यन खानसह (Aryan Khan Drugs Case) इतरांना अटक केली होती.

तिघांना काल (गुरुवार) जामीन मंजूर झाला असली तरी आदेशाची प्रत आज उपलब्ध होणार होती.
त्यामुळे तिघांना कालची रात्र देखील तुरुंगात घालवावी लागली होती. जामीनाची प्रत आज उपलब्ध झाली असून आर्यनसह तिघांना आज घरी जाता येणार आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने आर्यनसह (Aryan Khan Drugs Case) तिघांना अटी घातल्या आहेत.

Pune Crime | पुण्यातील विनयभंग प्रकरणात राज्यस्तरीय टेनिस खेळाडूचा जामीन मंजूर

या आहेत अटी

आर्यनसह तिघांना जामीन मंजूर करताना मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे (Justice Nitin Sambre) यांनी आपल्या मुख्य आदेशात अनेक मुद्दे स्पष्ट केले आहेत.

1. आर्यन खान, अरबाझ मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha)
यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची वैयक्तिक हमी आणि तेवढ्याच रकमेचे एक किंवा अधिक हमीदार देण्याच्या अटीवर
जामीन मंजूर करण्यात आला आहे.

2. तिन्ही आरोपींना तात्काळ विशेष एनडीपीएस कोर्टात (NDPS Court) पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

3. कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास तिघांनाही मनाई करण्यात आली आहे.

4. प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत एनसीबी कार्यालयात आर्यनसह तिघांना हजेरी लावावी लागले.

5. तिघांना कधीही मुंबईबाहेर जायचे असल्यास त्यांना एनसीबीच्या तपास अधिकाऱ्याला त्याची माहिती देऊन प्रवास व निवासाचा तपशील द्यावा लागेल.

6. अत्यंत अपरिहार्य कारण असल्याचे वगळता खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला तिघांना कोर्टात हजर रहावे लागेल.

7. आरोपींनी खटल्यावर परिणाम होणार नाही असे कोणतेही कृत्य करु नये.

8. आरोपींवर जो आरोप आहे आणि जो गुन्हा दाखल झाला आहे तशाप्रकारच्या कृत्यात त्यांनी सहभागी होऊ नये.

9. या प्रकरणातील सहआरोपी आणि अशाप्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये.

10. या प्रकरणातील साक्षीदारांवर स्वत: किंवा कोणाच्याही माध्यमातून दबाव आणू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करु नये.

11. या प्रकरणासंदर्भातील खटल्याबाबत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडियावर काहीही वक्तव्य करुन नये.

12. खटल्याची सुनावणी लांबवण्याचा कोणताही प्रयत्न करु नये.

13. या सर्व घातलेल्या अटींपैकी कोणतीही अट आरोपींपैकी कोणी मोडली तर एनसीबीला त्यांचा जामीन रद्द होण्यासाठी थेट विशेष एनडीपीएस कोर्टात अर्ज करता येईल.

हे देखील वाचा

Saral Pension Yojana | दरमहा पाहिजेत 12000 रुपये तर केवळ 1 वेळ प्रीमियम देऊन घ्या LIC चा ‘हा’ विशेष प्लान, जाणून घ्या सर्वकाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Aryan Khan Drugs Case | a copy of aryan khans bail has been issued and here are the court conditions for bail in drugs case mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update