Aryan Khan Drugs Case | आर्यन खानची सुटका पुन्हा लांबणीवर? आजची रात्र जेलमध्येच; कोर्टात नेमकं काय झालं, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Drugs Case) महत्त्वाची सुनावणी काल मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुरु झाली होती. परंतु ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जावर आज उर्वरीत सुनावणी झाली. आर्यनचा युक्तीवाद काल पूर्ण झाला होता. आता अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा तर्फे (Moonmoon Dhamecha) युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे (Justice Nitin Sambre) यांनी आज सुनावणी ठेवली. यावेळी एनसीबीच्या (NCB) वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग (Additional Solicitor General Anil Singh) यांच्यासह श्रीराम शिरसाट (Shriram Shirsat) आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना (Special Public Prosecutor Advait Sethna) हे हजर होते. मर्चंट आणि धमेचा यांचा युक्तिवाद आज संपला असून एनसीबीचा उद्या होणार आहे. त्यामुळे आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी निर्णय (Aryan Khan Drugs Case) घेण्यात येणार आहे.

 

आज युक्तिवादादरम्यान अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई (Amit Desai) यांनी रेव्ह पार्टीमध्ये सेवन करताना एनसीबीने आरोपींना पकडते आणि नंतर त्यांची त्वरित तपासणी केली जाते. मात्र, या प्रकरणात एनसबीने ते केलेले नाही असे कोर्टाला सांगितले आहे. देसाई यांनी एनसीबीने मांडलेल्या कट कारस्थानाच्या थिअरीमध्ये आरोपी असलेल्या याच प्रकरणातील दोघांना काल विशेष एनडीपीएस कोर्टानेही (Special NDPS Court) जामीन मंजूर (Bail granted) केल्याचे सांगितले. क्रूझ परत आल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्यांना सेवनाच्या आरोपाखाली (Aryan Khan Drugs Case) अटक केली होती.

एनसीबीच्या दाव्यानुसार, अरबाज मर्चंटने जबाबात चरस बाळगल्याचे मान्य केले आणि आर्यनसोबत सेवन करण्यासाठी जात होतो, असेही मान्य केले. मात्र, त्या जबाबाविषयी त्यानं माघार घेतली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) तुफान सिंह निवाड्याप्रमाणे एनसीबी अधिकाऱ्यासमोर दिलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. तसेच त्या जबाबातही केवळ अमली पदार्थ सेवनाविषयी कबुली आहे. त्यामुळे केवळ तेवढेच कलम लागू होते. कट कारस्थानाचा भागच नाही, असा युक्तीवाद अ‍ॅड. अमित देसाई यांनी केला.

 

Web Title :- Aryan Khan Drugs Case | aryan khan also in jail tonight hearing bail application will be held tomorrow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | ‘पोलीसनामा’ इम्पॅक्ट ! ‘सर्वपक्षीयांनी’ स्मार्ट सिटीचे 58 कोटी रुपयांचे दायित्व महापालिकेवर लादले; राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कॉंग्रेसला पुन्हा एकदा ‘पश्‍चाताप’

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 104 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी