Aryan Khan Drugs Case | आर्यन खान मन्नतवर पोहचला पण ‘या’ कारणामुळं मुनमुन धमेचा तुरूंगातच अडकली, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aryan Khan Drugs Case | कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात विशेष एनडीपीएस न्यायालयाने ९ जणांना जामीन दिला आहे. त्यामध्ये आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) आणि अरबाज मर्चंट (arbaaz merchant) यांचा समावेश असून त्यांची शनिवारी कारागृहातून सुटका करण्यात आली. दरम्यान, जामीनदार मिळविण्यासाठी अडचणी आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे याच प्रकरणात अटक करण्यात आलेली मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha) ही मात्र अद्याप तुरुंगातच आहे.

एनडीपीएस कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील (Special Judge of the NDPS Court V. V. Patil) यांनी गोमित चोप्रा, नुपूर सतिजा, समीर सहगल, गोपाळजी आनंद, मानव सिंघल, भास्कर अरोरा, इश्मित सिंग चढ्ढा, श्रेयस नायर यांना जामीन दिला आहे. मूळची मध्यप्रदेश असलेली मुनमुन धमेचा हिला जामीनदार मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे तिला शनिवारची रात्र कारागृहातच काढावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे (Mumbai High Court Justice Nitin Sambre) यांनी मुनमुनच्या वकिलांना सुट्टीकालीन न्यायालयामोर हा अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. मुनमुनला झालेली अटक बेकायदा असल्याचे यापूर्वी झालेल्या युक्तिवादावेळी मुनमूनचे वकील अली काशिफ खान देशमुख (Lawyer Ali Kashif Khan Deshmukh) यांनी सांगितले होते. आज ती कारागृहाबाहेर पडू शकते. आरोपींची रोख रकमेच्या जामिनावर सुटका करण्याची विनंतीही न्यायाधीशांना मान्य असून आतापर्यंत एकूण २० आरोपींपैकी १४ जणांना जामीन मंजूर झाला आहे.

क्रूझवरील (Aryan Khan Drugs Case) परतीच्या प्रवासानंतर ४ ऑक्टोबर रोजी अविन साहू व मनीष राजगढिया यांना अटक केली होती.
त्यांनाही एनडीपीएस कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जामीन यापूर्वीच मंजूर केला होता.
दरम्यान गुरुवारी न्यायालयाने आर्यन खान, अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला होता.
त्यामुळे आता ११ आरोपींना आतापर्यंत जामीन मिळाला आहे.
तर विक्रांत छोकर, मोहक जस्वाल, अब्दुल कादीर शेख, शिवराज हरिजन आणि दोन नायजेरियन नागरिक हे अटकेत आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणूकीसह पिस्तुल दाखवून धमकाविल्याचा गुन्हा दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Aryan Khan Drugs Case | aryan khan drug case bail but for this reason munmun dhamecha stuck jail at mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update