Aryan Khan Drugs Case | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aryan Khan Drugs Case | क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Drugs Case) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याच्यावर आरोपपत्र (Chargesheet) दाखल करण्यासाठी एनडीपीएस विशेष न्यायालयासमोर (NDPS Special Court) एनसीबीने (NCB) 90 दिवसांचा कालावधी देण्यासंदर्भात मुदत मागणीचा अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय देत विशेष न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

 

विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील (Special Court Justice VV Patil) यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद (Argumentation) ऐकून घेतला. त्यानंतर 60 दिवसांची मुदतवाढ दिली दरम्यान, युक्तिवाद करताना एनसीबीने अशी काही कारणे सांगितली की, न्यायालयाला मुदतवाढ देणे भाग पडले. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह (Aryan Khan Drugs Case) 19 जणांना आरोपी केले असून 3 ऑक्टोबरला आर्यनला अटक (Arrest) करण्यात आली होती.

 

कोरोनामुळे झाला अहवालास विलंब
या प्रकरणात एनसीबीने केमिकलचे 17 प्रकारचे नमुने चाचणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल 12 मार्चला आला असून जो माल पोलिसांनी जप्त केला आहे तो ड्रग्ज (Drugs) असल्याचे सिद्ध झाले. हा अहवाल आता मिळण्याचे कारण म्हणजे कोरोना (Corona) काळ. कोरोनामुळे नोव्हेंबर 2021 ते 22 फेब्रुवारी 2022 इतका काळ अहवाल येण्यास लागल्याचे एनसीबीने अर्जात म्हंटले आहे. फितूर झालेला पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा (Affidavit) निर्णयही न्यायालयाने घेतला नाही. त्याचबरोबर पहिला पंच साक्षीदार के पी गोसावी (KP Gosavi) हा अन्य एका प्रकरणात कोठडीत आहे. त्यामुळे त्याचीही साक्ष अर्धवट राहिली आहे. असे न्यायालयाला सांगण्यात आले.

 

Web Title :- Aryan Khan Drugs Case | cruise drugs case 60 days extension for chargesheet against aryan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा