Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) अटकेत असलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धामेचा (Moonmoon Dhamecha) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला (bail application rejecte) आहे. हा आर्यन खा याच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आर्यन खानला आता जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) अर्ज करावा लागणार आहे. तो पर्यंत आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) याला तुरुंगात राहावे लागणार आहे.

मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा मारल्यानंतर एनसीबीने (NCB) आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर सारिका, विक्रांत चोकेर, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा यांना अटक केली आहे. आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांचा जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. आज आर्यनला जामीन मंजूर होईल अशी अपेक्षा होती.

आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी जामिनासाठी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अडीच तास युक्तिवादानंतर कोर्टाने आर्यनसह अरबाज आणि मूनमून यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आता या निकालानंतर आर्यन खानला काही दिवस मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातच (Arthur Road jail in Mumbai) मुक्काम करावा लागणार आहे.

क्रूझ पार्टीप्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अटक करण्यात आलेल्या
आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना आर्थर रोड कारागृहात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
परंतु तरीही कारागृहाच्या नियमांनुसार नवीन आरोपींना सुरुवातीचे कही दिवस (5 ते 6) क्वारंटाईन केले जाते.
त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी केली जाईल. आर्यन आणि अरबाजमध्ये काही लक्षणं आढळल्यास त्यांना कोठडीत ठेवलं जाईल.
सध्या आर्यन व अरबाज यांना नवीन करागृहातील पहिल्या माळ्यावरील बराक क्रमांक एक मध्ये ठेवण्यात आले आहे.
तर आरोपी मुनमुन धामेचा हिला भायखळा कारागृहात हलवण्यात आले आहे.

Web Title :- Aryan Khan Drugs Case | drug case aryan khan bail applicatin rejected by court today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवार अडकले धरणाच्या मधोमध, म्हणाले – ‘इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत’

MP Supriya Sule | ‘इन्कम टॅक्स’च्या छाप्यानंतर खा. सुप्रिया सुळे बोलेल्या, म्हणाल्या – ‘संघर्ष करणं पवारांची खासियत, महाराष्ट्र दिल्ली पुढं झुकणार नाही’

Cyber Crime News | धक्कादायक ! 19 वर्षाच्या पोराकडून तब्बल 50 हून अधिक शिक्षीका अन् मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त, पुढं झालं असं काही…