Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा ‘पंच’ किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Aryan Khan Drugs Case | मुंबईतील क्रूझ ड्रग्स पार्टी आणि आर्यन खान प्रकरणातील (Aryan khan drug case) एनसीबीचा (NCB) पंच साक्षीदार किरण गोसावीला (Kiran Gosavi) पुणे पोलिसांनी (Pune Police) पुण्यातून अटक केली. त्यानंतर किरण गोसावीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे. किरण गोसावी याला 2018 मधील फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

 

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांना पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली होती.
यावेळी आयुक्तांनी ज्या ज्या नागरिकांची फसवणूक किरण गोसावी (Kiran Gosavi) याने केली आहे त्यांनी पुढे यावे आम्ही गुन्हे दाखल करु असे आवाहन केले.

 

10 दिवस पोलीस कोठडी देण्याची सरकारी विकलांची मागणी

 

किरण गोसावी विरोधात 2018 मध्ये गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्याविरोधात एप्रिल 2019 मध्ये चार्जशीट पाठवण्यात आली.
किरण गोसावीची सेक्रेटरी शेरबानो कुरेशी (Secretary Sherbano Qureshi) हीच्या अकाऊंटमध्ये चिन्मय देशमुखने (Chinmay Deshmukh) तीन लाख रुपये पाठवले होते.
मात्र, शेरबानो कुरेशीचे हे अकाउंट किरण गोसावी बनावट कागपत्रांच्या आधारे वापरत होता.
पैसे परत मागितल्यावर त्याने चिन्मय देशमुखला धमकी दिली आणि शिवीगाळ केली.
किरण गोसावी याच्याविरोधात ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
त्याने अनेकांना फसवले आहे. यामध्ये अनेकांची मोठी फसवणूक झाली आहे.
त्याचा तपास करायचा असल्याने किरण गोसावीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांनी मागणी न्यायालयाकडे केली.
परंतु न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Aryan Khan Drugs Case)

 

Web Title : Aryan Khan Drugs Case | Kiran Gosavi NCB witness in the drugs on cruise matter remanded in police custody for 8 days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यात विद्युत परिवहनकडून अल्‍टीग्रीनसह लास्‍ट-माइल डिव्हिलरी सर्विसेसचा शुभारंभ

Aryan Khan Drugs Case | अखेर ‘मन्नत’ पूर्ण ! मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खानचा जामीन मंजूर (व्हिडिओ)

Isha Ambani | ईशा अंबानी यांची ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट’च्या बोर्डावर नियुक्ती