Aryan Khan Drugs Case | NCB सांगत असलेला मुख्य साक्षीदार किरण गोसावी सराईत गुन्हेगार ! पुण्यासह 3 ठिकाणी गुन्हे दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कॉर्टेलिया क्रुझवर (Cortellia Cruz) एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) याच्यासह 8 जणांना अटक केली. NCB नं केलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गौप्यस्फोट केल्याने अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) ज्या किरण गोसावीला (Kiran Gosavi) एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे, तो एक सराईत गुन्हेगार (Criminal) असल्याचे समोर आले आहे. किरण गोसावी याच्यावर पुणे (Pune आणि मुंबईत (Mumbai) गुन्हे (FIR) दाखल आहेत. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत दिले आहे.

किरण गोसावी याच्यावर दाखल असलेले गुन्हे हे लोकांची फसवणूक (Cheating) करुन लाखो रुपये घेणे, धमकी (Threat) देणे यासारखे गुन्हे आहेत.
काही गुन्ह्यामध्ये त्याला अटक (Arrest) झाली होती तर एका गुन्ह्यात तो अद्यापही फरार असल्याचं रेकॉर्डवर आहे.
त्यामुळे एक फरार आरोपी एवढ्या मोठ्या (Aryan Khan Drugs Case) प्रकरणात एनसीबीचा प्रमुख साक्षीदार कसा असू शकतो ?
एक फरार घोषीत करण्यात आलेला आरोपी एवढ्या मोठ्या प्रकरणात आर्यन खान सारख्या हाय प्रोफाईल आरोपीला ताब्यात घेऊन कसा जाऊ शकतो ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

पुण्यात फसवणुकीचा गुन्हा

आरोपी किरण प्रकाश गोसावी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल आहे. किरण गोसावी याने मे 2018 मध्ये फेसबुकवरुन मलेशियात (Malaysia) नोकरी (JOB) मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची तीन लाखाची फसवणूक केली होती.
याबाबत पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) 29 मे 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु तो सापडत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते.

ठाण्यातील गुन्ह्यात चार्ज शीट दाखल

किरण गोसावी हा ढोकाळी येथील राहणारा आहे. त्याच्यावर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbawdi police station) फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
2015 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्याला अटक देखील करण्यात आली होती.
एका व्यक्तीला नोकरीचे आमिष दाखून पैसे उकळल्याचा आरोप त्याचावर करण्यात आला होता. त्यांनंतर त्याला अटक करण्यात आली होती.
या केसमध्ये चार्ज शीट दाखल (charge sheet) करण्यात आली असून सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे.

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक

किरण गोसावी याच्या विरोधात गुन्हा अंधेरी पोलीस ठाण्यात (Andheri police station) दाखल आहे. 3 जानेवारी 20007 मध्ये व्यंकटेशम शिवा वायरवेल या व्यक्तीने तक्रार दिली आहे.
तक्रारदाराने आरोप केला आहे की, किरण गोसावी आणि विनोद मकवान या दोन्ही आरोपींनी त्याच्या क्रेडिट कार्डची (Credit card) डिलिव्हरी न देता त्यांच्या क्रेडिट कार्डने 17 हजार 500 रुपयांची शॉपिंग केली होती. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली होती, आणि कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं.
परंतु या प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता झाली होती.

 

पुणे पोलीस अटक करण्याच्या तयारीत

ड्रग्स प्रकरण उघडकीस (Aryan Khan Drugs Case) आल्यानंतर किरण गोसावी याचा आर्यन सोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता.
यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत किरण गोसावी याच्यावर आरोप करत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.
आता ज्या केसमध्ये किरण गोसावी फरार आहे, त्या केसमध्ये त्याला अटक करण्याची तयारी पुणे पोलीस (Pune Police) करत आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार पोलीस त्याचा शोध घेत असून त्याला लवकरच अटक केली जाणार आहे.

 

Web Title : Aryan Khan Drugs Case | kiran gosavi the main witness of ncb in the drug party case is a notorious criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dating App Bumble | सेक्सआणि जवळीकता याबाबत भारतीय तरूणांच्या विचारात मोठा बदल, ‘बम्बल’ सर्वेक्षणातून झाला खुलासा

Narayan Rane | भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नारायण राणेंना स्थान नाही; चर्चेला उधाण

Dolly Khanna | लोकांना मालामाल करत आहे ‘ही’ महिला, 1 लाखाचे बनवले 2.26 कोटी रुपये; जाणून घ्या कसे