×
Homeताज्या बातम्याAryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीविरोधात...

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांची ‘लुकआऊट नोटीस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कॉर्टेलिया क्रूझवर (Cortellia Cruz) एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) याच्यासह 8 जणांना अटक केली. या प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) ज्या किरण गोसावीला (Kiran Gosavi) एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे, तो एक सराईत गुन्हेगार (Criminal) असल्याचे समोर आले आहे. किरण गोसावी याच्यावर पुणे (Pune) आणि मुंबईत (Mumbai) गुन्हे (FIR) दाखल असून पुणे पोलिसांनी (Pune Police) त्याच्या विरुद्ध लुकआऊट नोटीस (Lookout notice) काढल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Naranware) यांनी सांगितली.

किरण गोसावी याच्यावर दाखल असलेले गुन्हे हे लोकांची फसवणूक (Cheating) करुन लाखो रुपये घेणे, धमकी (Threat) देणे यासारखे गुन्हे आहेत.
काही गुन्ह्यामध्ये त्याला अटक (Arrest) झाली होती तर एका गुन्ह्यात तो अद्यापही फरार असल्याचं रेकॉर्डवर आहे.
पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात फरार असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध लुकआऊट नोटीस काढली आहे.
गोसावी विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. (Aryan Khan Drugs Case)

पुण्यात फसवणुकीचा गुन्हात फरार

आरोपी किरण प्रकाश गोसावी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल आहे. किरण गोसावी याने मे 2018 मध्ये फेसबुकवरुन मलेशियात (Malaysia) नोकरी (JOB) मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची तीन लाखाची फसवणूक केली होती. फिर्यादी यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना मलेशियाला पाठवले.
मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. यानंतर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) 29 मे 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु तो सापडत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते.

ठाण्यातील गुन्ह्यात चार्ज शीट दाखल

किरण गोसावी हा ढोकाळी येथील राहणारा आहे. त्याच्यावर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbawdi police station) फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 2015 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्याला अटक देखील करण्यात आली होती.
एका व्यक्तीला नोकरीचे आमिष दाखून पैसे उकळल्याचा आरोप त्याचावर करण्यात आला होता.
त्यांनंतर त्याला अटक करण्यात आली होती.
या केसमध्ये चार्ज शीट दाखल (charge sheet) करण्यात आली असून सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे.

 

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक

किरण गोसावी याच्या विरोधात गुन्हा अंधेरी पोलीस ठाण्यात (Andheri police station) दाखल आहे. 3 जानेवारी 20007 मध्ये व्यंकटेशम शिवा वायरवेल या व्यक्तीने तक्रार दिली आहे.
तक्रारदाराने आरोप केला आहे की, किरण गोसावी आणि विनोद मकवान या दोन्ही आरोपींनी त्याच्या क्रेडिट कार्डची (Credit card) डिलिव्हरी न देता त्यांच्या क्रेडिट कार्डने 17 हजार 500 रुपयांची शॉपिंग केली होती. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली होती, आणि कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं.
परंतु या प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता झाली होती.

 

Web Title : Aryan Khan Drugs Case | mumbai cruise drugs case aryan khan kiran gosavi aryan khan pune police DCP Priyanka Naranware

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | घरफोडी करणारे 2 सराईत पुणे पोलिसांकडून गजाआड, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Diabetes | डायबिटीज रुग्णांनी आवश्य खावी ‘ही’ वनस्पती, ब्लड शुगर होईल नियंत्रित; जाणून घ्या

Sharad Pawar | ‘आमची पोरं काय करतील याचा नेम नाही’ शरद पवारांनी सांगितला जयंत पाटलांच्या मुलाचा ‘किस्सा’ 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News