Aryan Khan Drugs Case | वानखेडेंवर आरोप करणारे प्रभाकर साईल यांच्या आई हिरावती यांचा मोठा गौप्यस्फोट; जाणून घ्या आता कोण अडचणीत येणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी वेगवेगळे खुलासे होत आहे. काल आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणामध्ये (Aryan Khan Drugs Case) किरण गोसावी (Kiran Gosavi) याचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. किरण गोसावीनं शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा गौप्यस्फोट केला. मात्र, आता प्रभाकर साईल यांच्या आईनं त्याहून मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला (Aryan Khan Drugs Case) आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

 

प्रभाकर साईलबाबत त्यांची आई हिरावती साईलनं (Hiravati Sail) धाक्कादायक दावे केल्याचे समोर आले आहे. याबाबत एका वृत्तवाहीनीने वृत्त दिले आहे. प्रभाकर हा गेल्या 4 महिन्यांपासून आमच्या संपर्कात नसल्याचं हिरावती साईल यांनी म्हटले आहे. प्रभाकर कुठे राहतो, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

प्रभाकरच्या आईन वृत्तवाहिनीला सांगितले, प्रभाकरला मी काय सांगणार, तो कुठे राहतो ते आम्हाला काहीही माहिती नाही.
मागील चार महिन्यांपासून त्याने आमच्याशी संपर्कही केलेला नाही. आमच्याशी बोललेला नाही.
तसंच त्यांने आमची विचारपूसही केलेली नाही. तसेच कधी त्याने आम्हाला पाच पैसे दिलेले नाहीत.
त्याचं आमच्याशी काही देणंघेणं नाही. येथे घरात असलेले कपडालत्ता तो घेऊन गेलाय, आता आमच्या इथं त्याचं काहीही नाही.
त्याने जे गौप्यस्फोट केले त्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नसल्याचे हिरावती यांनी (Aryan Khan Drugs Case) सांगितले.

आम्ही मुळचे कोकणातले (Kokan) असून गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत (Mumbai) वास्तव्यास आहोत.
प्रभाकर विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. मात्र, त्याची पात्नी त्याच्यासोबत राहत नसून मुलींना घेऊन माहेरी राहते,
असं प्रभाकर साईलच्या आईने सांगितले आहे.

 

Web Title :- Aryan Khan Drugs Case | mumbai drug case prabhakar sail mother shocking revelation about her son know who will be come in trouble

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Air India चा सौदा झाला पक्का ! DIPAM ने सांगितले – ‘18000 कोटी रुपयांच्या करारावर झाले हस्ताक्षर’

IPL 2022 Team Auction | अहमदाबाद आणि लखनऊ संघ खेळणार आयपीएल, BCCI ला मिळाले 12 हजार कोटी

Pune Fire | पुण्यातील गंगाधाम चौकातील फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; अग्नीशमनचे 14 बंब घटनास्थळी दाखल