Aryan Khan drugs case | कोण आहेत यास्मीन? समीर वानखेडे यांच्यासाठी ज्यांनी केला मंत्री नवाब मलिक यांच्यावर सर्वात मोठा ‘हल्ला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आर्यन खान ड्रग्ज केस (Aryan Khan drugs case) मध्ये एनसीबीच्या साक्षीदाराच्या कथित मोठ्या आरोपानंतर नवीन ट्विस्ट (new twist) पहायला मिळत आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (NCB zonal director Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले (Aryan Khan drugs case) आहेत.

 

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी समीर वानखेडे यांच्याविरूद्ध अनेक पुरावे सादर करीत त्यांच्या नोकरीच्या रिझर्व्हेशनसह अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आता समीर वानखेडे यांची बहिण यास्मीन (Sameer Wankhede’s sister Yasmin) आपल्या भावाचे समर्थन करण्यासाठी पुढे आली आहे.

 

आमच्या जीवाला धोका : यास्मीन

 

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बहिण यास्मीन यांनी नवाब मलिक यांच्यावर हल्ला करत म्हटले की, नोकरशाहच्या जन्म दाखल्याचा शोध घेणारा तो (नवाब मलिक) कोण आहे?
त्यांच्या रिसर्च टीमने मुंबईचा फोटो (Aryan Khan drugs case) दुबईचा असल्याचे सांगून पोस्ट केला…आमच्या जीवाला धोका आहे.

 

आम्हाला धमकीचे कॉल येत आहेत. मला वाटते की, मी सुद्धा रोज खोटे पुरावे सादर केले पाहिजेत.
ज्याबाबत काहीच पुरावे नाहीत त्या गोष्टींद्वारे आमच्या कुटुंबाला निशाणा बनवले जात आहे आणि छळ केला जात आहे.

 

पती समीरच्या बचावासाठी आली पत्नी क्रांती रेडकर-वानखेडे

 

यापूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या फोन टॅपच्या आरोपावर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती वानखेडे (Kranti Redkar, wife of Sameer Wankhede) यांनी म्हटले की,
हे सर्व दावे खोटे आहेत आणि जर त्यांच्याकडे (नवाब मलिक) असे पुरावे आहेत तर त्यांनी (नवाब मलिक) कोर्टात सादर करावे तेव्हाच त्यावर न्याय मिळेल.

 

ट्विटरवर कुणीही काहीही लिहू शकतात ते सत्य होणार नाही. आम्हाला सुरक्षा दिली आहे कारण आमच्या जीवाला धोका आहे.
आम्हाला, आमच्या मुलांना आणि कुटुंबाला धमकावले जात आहे.

 

समीर वानखेडे एक इमानदार अधिकारी : क्रांती

 

क्रांती वानखेडे यांनी म्हटले की, कुणी आमच्याकडे पहात असेल तर वाटते का पहात आहे.
आम्ही सर्व मेसेज सांभाळून ठेवले आहेत आणि वेळ आल्यानंतर समोर ठेवू.
समीर वानखेडे एक इमानदार अधिकारी आहेत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने अनेक लोकांना अडचण होते.
अनेकांना वाटते की, त्यांनी खुर्ची सोडावी आणि त्यांचे पोट भरत (Aryan Khan drugs case) राहावे.

 

बनावट सर्टिफिकेट बनवण्याच्या आरोपावर क्रांती रेडकरचे उत्तर

 

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर बनावट सर्टिफिकेट बनवल्याचा आरोप केला होता.
यावर क्रांती रेडकर यांनी म्हटले की, समीर वानखेडे यांच्या पूर्ण गावाचे सर्टिफिकेट पहा.
त्यांच्या संपूर्ण वानखेडे कुटुंबाचे सर्टिफिकेट पहा. एक मनुष्य खोटे सर्टिफिकेट बनवू शकतो, संपूर्ण गाव बनवू शकते का.

 

समीर वानखेडे यांनी आपल्या जातीचे सर्टिफिकेट (Sameer Wankhede’s caste certificate) आज नवाब मालिक यांना पाठवले.
या सर्टिफिकेटमध्ये वडीलांचे नाव ज्ञानदेव लिहिले आहे. नवाब मलिक यांनी म्हटले होते की, समीर वानखेडे आपल्या जातीचा दाखला का दाखवत नाहीत.

 

Web Title : Aryan Khan drugs case | ncb officer sameer wankhede s sister yasmeen hits out maharashtra minister nawab malik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Cyber Police | मॅट्रोमोनी साईटवरुन लाखोंचा गंडा घालण्याऱ्या दोन नायजेरियन आरोपींना दिल्लीतून अटक

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,370 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्यात झाली घसरण, मिळतंय 9000 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर