आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत आर्यन पठाडेला सुपवर्णपदक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या वाको इंडियन ओपन आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पुण्यातील पर्वती येथे राहणाऱ्या आर्यन पठाडे याने दोन सुवर्णपद पटकावले आहेत. लाईट कॅन्टक किक या प्रकरणात आर्यनने 28 किलो वजनी गटामध्ये ही कामगिरी केली आहे. ही स्पर्धा दिल्ली येथील टाल कटोरा या स्टेडियमध्ये पार पडली.

यापूर्वी आर्यन पठाडे याने अहमदनगर आणि तेलंगणा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्रत्येकी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्याला आर्य स्पोटर्स फाऊंडेशनचे प्रशिक्षक सागर सुर्वे यांनी प्रशिक्षण दिले. त्याने राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीची दखल घेऊन सिंहगड स्प्रिंग डेल शाळेने त्याचा 26 जानेवारी रोजी खास पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

आर्यन याने आत्तापर्यंत राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 11 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतूक होत असून पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत. आर्यन याने नुकत्याच दिल्ली येथे दोन सुवर्ण पदकांची कमाई केल्याने त्याचे सिंहगड रोड परिसरातील नागरिकांकडून आणि तो शिकत असलेल्या शाळेकडून त्याचे कौतूक करण्यात येत आहे.