कोण आहे आर्यानंदा ? हिंदी भाषा येत नसताना देखील ‘मधूर’ स्वरांनी जिंकलं सारेगामापा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सारेगामापाचा आणखी एक सीजन संपत आला आहे आणि टीव्हीच्या दुनियेला त्यांचा नवीन गायन विजेता मिळाला आहे. केरळहून आलेल्या आर्या नंदा बाबूने सारेगममापा 2020 ट्रॉफी जिंकली आहे. चला तर मग जाणून घेऊया आर्य नंदाबद्दल काही गोष्टी….

आर्या नंदा बाबू ही केरळमधील कॅलिकट येथील रहिवासी आहे. आर्या नंदा सारेगामा शोची चॅम्पियन बनली पण तिला हिंदी येत नाही. याचा तिने स्वत: शोमध्ये खुलासा केला होता.

आर्या नंदाने फिनालेच्या सादरीकरणाआधी तिच्या जर्नी भागात सांगितले होते की, जेव्हा ती ऑडिशनसाठी आली तेव्हा जज अलका याज्ञिक आणि इतरांचे शब्द तिला समजत नव्हते. कारण तिला हिंदी येत नव्हती.

आर्या नंदा 12 वर्षांची आहे आणि ती आपल्या पालकांसह केरळमध्ये राहते. तिच्या कर्तृत्वामुळे तिचे पालक खूप आनंदित आहेत. हिंदी भाषा न येताही आर्या नंदाने स्वत: च्या आवाजाने सारेगममाच्या स्टेजवर जज अलका याज्ञिक, जावेद अली आणि हिमेश रेशमिया यांची मने जिंकली आणि शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या मनातही जागा निर्माण केली.

आर्या नंदा सांगते की, तिच्यासाठी सगळ्यात खास क्षण तो होता जेव्हा तिने सत्यम शिवम सुन्दरम गाणे गायले होते आणि जज अलका याज्ञिक यांनी तिला आपल्या मिठीत घेतले होते.

शोमध्ये हिमेश रेशमियाने आर्या नंदा बाबूला डीवाइन चाइल्ड नाव दिले होते. ते म्हणायचे की, आर्या नंदा तिच्या गाण्याद्वारे संपूर्ण वातावरणाला डिवाइन एनर्जीमध्ये बदलून टाकते. सारेगामापा 2020 हा टप्पा आर्या नंदाच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी होती. हा शो जिंकल्यानंतर ती मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनण्यासही तयार झाली आहे.

विजयामुळे खूप उत्साहीत झालेली आर्या नंदा बाबू एका मुलाखतीत म्हणाली की, “खरे सांगायचे तर माझे स्वप्न खरे झाले आहे. सारेगममापा लिटिल चॅम्प्सचा हा प्रवास माझ्यासाठी एक चांगला शिकण्याचा अनुभव होता. मी सर्व मार्गदर्शक आणि जज यांची आभारी आहे, ज्यांनी मला नेहमीच साथ दिली आणि मला गायक म्हणून माझी क्षमता ओळखण्यास मदत केली.

माझा हा अविस्मरणीय प्रवास संपत आहे, मी माझ्या मित्रांच्या मौल्यवान आठवणी आणि मी शिकलेले ज्ञान आणि आयुष्यासाठी टिकणारे सर्वात महत्वाचे नाते मी माझ्याबरोबर घेऊन जाईल. मला येथे माझे कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद होत आहे आणि मला ही संधी दिल्याबद्दल सारेगममापा लिटिल चॅम्प्स आणि झी टीव्हीची मी आभारी आहे. ”