आर्य मूळचे भारतीयच ! डेक्कन कॉलेजच्या संशोधकांचा ‘शोध’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाने महत्वाचा शोध लावला असून आर्य हे मूळचे भारतीयच असल्याचा त्यांनी शोध लावला आहे. आर्य हे भारतीयच होते व त्यांनीच हडप्पा संस्कृती निर्माण केल्याचे डीएनएचे पुरावे तसेच पुरातत्वशास्त्राच्या आधारे हे सिद्ध करण्यात आल्याचा दावा डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी केला आहे.

त्याचबरोबर ब्रिटिशांनी व काही भारतीय इतिहासकारांनी पसरवलेला गैरसमज यामुळे दूर झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.  आर्य हे भारतीय कि बाहेरून आले होते, यावर अनेक वाद विवाद झाले आहेत. तसेच प्रत्येकाने आपल्या संशोधन पद्धतीने ते सिद्ध देखील केले आहे. मात्र या विद्यापीठाने 2011-12 साली राखीगडी  येथे या संशोधनाची सुरुवात केली. यासाठी त्यांनी हरियाणा सरकारच्या पुरातत्व व संग्रहालय  विभागाची देखील मदत घेतली.

यामध्ये 12 ते 13 जणांच्या टीमने याठिकाणी संशोधन करत हे सिद्ध केले आहे. या ठिकाणी उत्खनन करण्यात आल्यानंतर हैदराबादमधील सेंटर फॉर सेल्युलर आणि मोलेक्युलर बायलॉजी येथील डॉ. नीरज पै  आणि अमेरिकेतील हार्वर्ड स्कूल ऑफ  मेडिसीन विभागातील प्रा. डेव्हिड रिच यांनी या प्राचीन डीएनएचा अभ्यास करून आर्य हे भारतीयच होते हे सिद्ध केले.  याविषयी अधिक बोलताना डॉ. शिंदे यांनी सांगितले कि, या पुराव्यांच्या आधारे सिद्ध होत आहे कि, आर्य हे भारतीयच होते आणि  त्यांनी  ईथेच हडप्पा संस्कृतीची निर्मिती केली. त्यामुळे याआधी करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे देखील स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

अतिक्रमण हि थापच

आर्यांनी भारतावर आक्रमण करून या ठिकाणी स्थलांतर केल्याचे सर्व काही खोटे आहे. आर्य हे मूळ भारतीयच असल्याचे या संशोधनाने पुन्हा एकदा सिद्ध केल्याचा पुनरुच्चार देखील डॉ. शिंदे यांनी केला.