बाळ रडलं म्हणून भारतीयांना विमानातून उतरवल

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

विमान उड्डाण करत असताना तीन वर्षांच्या बाळाला सिटबेल्ट बंधत असताना बाळाने रडण्यास सुरुवात केली. बाळाची आई त्याला शांत करत असताना विमानातील कर्मचारी आले आणि पत्नी आणि मुलावर जोरजोरात ओरडू लागले. त्यामुळं मूल आणखी घाबरुन जोरात रडू लागले. त्यामुळे चिडलेल्या कर्मचाऱ्यांनी भारतीय कुटुंबाला विमानातून खाली उतरवले. हा धक्कादायक प्रकार  युरोपातील प्रतिष्ठित एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2fd1a8c1-9bc2-11e8-a385-7b79668c0d02′]

‘तीन वर्षांचं मूल रडू लागल्यानं आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी विमानातील कर्मचाऱ्यानं त्याला भीती दाखवली. त्यामुळं तो आणखीनच रडू लागला. आमच्यासह विमानातील इतर भारतीय कुटुंबांनीही मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही विमानातून उतरवलं,’ असा आरोप या कुटुंबानं केला.

ब्रिटिश एअरवेजच्या लंडन-बर्लिन (बीए ८४९५)या विमानाच्या उड्डाणावेळी हा कथित प्रकार घडला. या बाळाचे वडील रस्ते वाहतूक मंत्रालयात सहसचिव या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी याप्रकरणी नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तक्रार केली आहे. ‘सुरक्षेसंबंधी उद्घोषणेनंतर आम्ही सीटबेल्ट बांधत होतो. माझ्या पत्नीनं मुलाला सीट बेल्ट बांधलं त्यावेळी ते रडू लागलं. माझी पत्नी त्याला शांत करत होती. त्यावेळी तेथे विमानातील कर्मचारी आले आणि पत्नी आणि मुलावर जोरजोरात ओरडू लागले. त्यामुळं मूल आणखी घाबरलं,’ असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36635425-9bc2-11e8-8a2f-6f8a79434039′]

विमानाच्या उड्डाणावेळी मुलाला खिडकीतून बाहेर फेकून देण्याची धमकी कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच आमच्या वर्णावरून आक्षेपार्ह टिप्पणी केली. आमच्या आसनाच्या मागे बसलेल्या एका भारतीय कुटुंबानंही मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला; तर त्यांनाही विमानातून उतरवण्यात आलं, असा आरोपही त्यांनी तक्रारीत केला.