पेपरलेस असेल बजेट, अर्थमंत्र्यांनी लाँच केले Union Budget Mobile App

नवी दिल्ली : केंद्रीय बजेट बनवण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. बजेट बनवण्याची अंतिम प्रक्रिया म्हणून पारंपारिक हलवा कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. तसेच, यावेळी अर्थमंत्र्यांनी ’युनियन बजेट मोबाइल अ‍ॅप’ लाँच केले. यासोबतच पेपरलेस बजेटची सुरूवात झाली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा बजेटचे प्रिंटींग होणार नाही. ’युनियन बजेट मोबाइल अ‍ॅप’द्वारे खासदार आणि सामान्य जनता बजेटशी संबंधीत डॉक्यूमेंट्स मिळवू शकतील.

या वर्षी कोविड-19 मुळे बजेटचे कागदावर प्रिंटींग होणार नाही. याशिवाय आर्थिक सर्वेक्षणाची (इकॉनॉमिक सर्वे) सुद्धा कागदावर छपाई होणार नाही. आर्थिक सर्वेक्षण 29 जानेवारीला संसदेच्या पटलावर ठेवले जाईल. यावर्षी हे दोन्ही कागदपत्र इलेक्ट्रॉनिक प्रकारात संसदेला दिले जातील.

युनियन बजेट मोबाइल अ‍ॅपची वैशिष्ट्ये

1. या मोबाइल अ‍ॅपमध्ये सर्व 14 बजेट कागदपत्र आहेत. यामध्ये वार्षिक आर्थिक विवरण, डिमांड फॉर ग्रँट, अर्थ विधेयक इत्यादी माहिती असेल.
2. अ‍ॅपमध्ये डाऊनलोडिंग, प्रिंटिंग, सर्च, झूम इन आणि आऊट, एक्सटर्नल लिंक इत्यादी फीचर्स आहेत. याचा इंटरफेस यूजर फ्रेंडली आहे.
3. हे अ‍ॅप इंग्रजी आणि हिंदीत आहे. हे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफार्मवर उपलब्ध असेल.
4. हे मोबाइल अ‍ॅप युनियन बजेटचे पोर्टल www.indiabudget.gov.in वरून सुद्धा डाऊनलोड करता येईल.
5. संसदेत अर्थमंत्र्यांनी बजेट भाषण पूर्ण केल्यानंतर कागदपत्र या अ‍ॅपवर उपलब्ध होतील.

बजेट सत्राचा पहिला टप्पा 29 जानेवारीपासून सुरू होईल आणि 15 फेबुवारीला समाप्त होईल. तर बजेटचे दुसरे सत्र 8 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत चालेल. 29 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणासह बजेट सत्राची सुरूवात होईल. 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाईल.