व्हाट्सअॅपवर चॅटिंग केली म्हणून, मैत्रिणीच्या बापाने दिला बेदम चोप

वसईः पोलीसनामा आॅनलाईन-

फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर व्हाट्सअॅपवर चॅटिंग करणे एका तरुणाला चांगलच महागात पडलं आहे. नालासोपारा येथे एका 18 वर्षीय तरूणाला चॅटिंग केली म्हणून मैत्रिणीच्या बापाने अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंकित गुप्ता असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुणाला नालासोपारा पश्चिमेकडील गुरूकुल क्लासेसमध्ये डांबून ठेऊन मुलीचे वडील सुनील दुबे यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास अमानुष मारहाण केली आहे. याप्रकरणी नलासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अद्याप मात्र पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याची माहिती अंकितचे वडील संजय गुप्ता यांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’13a00318-97f7-11e8-8c0a-3f3d57ce65e5′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंकित हा कांदिवलीमधील ठाकुर काॅलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत असून, तो नालासोपारा येथे वास्तव्यास आहे. मागील काहि दिवसापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून साक्षी दुबे या तरुणीशी अोळख झाली. यानंतर त्यांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले. पुढे त्यांचे व्हाॅट्सअॅपवर चॅटिंग सुरू झाले. दरम्यान, यांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले असावे. म्हणून साक्षीचे वडील सुनील दुबे याने तिचा मोबाईल काढून घेऊन अंकितशी चॅटिंग सुरू केले.

अंकीत 3 आॅगस्टला मित्राच्या वाढदिवसासाठी रात्री 9 च्या दरम्यान भाईंदरला गेला होता. त्यावेळी त्याच्याशी साक्षीच्या वडिलांनी व्हाॅट्सअॅपवर मेसेज करुन नालासोपारा रेल्वे स्थानकाबाहेर येण्यास सांगितले. यानंतर त्याला एसबीआय बॅंकेजवळ ये असा मेसेज आला. त्याप्रमाणे अंकित रात्री 10 वाजता तेथे पोहचला होता. यानंतर सुनील दुबे यांनी त्याला गुरुकुल क्लासमध्ये नेऊन बंद खोलीत रितेश तिवारीच्या मदतीने लोखंडी पकड, कंबरेचा पट्टा आणि लाकडी दांडका यांनी जबर मारहाण केली.