Coronavirus : रुग्णांच्या उपचारासाठी वाढतेय ‘ऑक्सिजन’ची मागणी, गेल्या 1 महिन्यात ‘इतके’ टक्के जास्त मागणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सध्या देशभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी 24 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. या दरम्यान रुग्णांसाठी ऑक्सिजन सपोर्ट (Oxygen support) ची मागणीही वाढली आहे. म्हणजेच रूग्णाला वाचविण्यासाठी अधिकाधिक ऑक्सिजनचा वापर रुग्णालयात केला जात आहे. गेल्या एक महिन्यादरम्यान ऑक्सिजनची मागणी 2 टक्क्यांनी वाढली आहे.

सतत वाढत आहे मागणी

एका वृत्तपात्राने आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, 7% सक्रिय रुग्ण जुलैच्या पहिल्या आठवड्यात ऑक्सिजन सपोर्ट वर होते. या दरम्यान कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला. जून महिन्यात 5 ते 5.5% रुग्ण असे होते जे ऑक्सिजन सपोर्टवर होते. कोरोनाच्या कोणत्याही रुग्णाचे आयुष्य वाचवण्यासाठी ऑक्सिजन थेरपी हा एक महत्वाचा दुवा आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सामान्यत: रुग्णांना श्वास घेण्यात त्रास होतो.

ऑक्सिजनची कमतरता नाही

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशात ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये कोणतीही कमतरता नाही. सध्याला दररोज 6000 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होत आहे. ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार होत आहेत तेथे दररोज 1100-1200 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला जातो. ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमागील मुख्य कारण म्हणजे दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील बर्‍याच भागात हॉटस्पॉट तयार होणे हे आहे.

बेडची संख्या वाढविली जात आहे

ऑक्सिजन सपोर्ट असणाऱ्या बेडची संख्या देखील देशभरात सतत वाढत आहे. 27 जूनपर्यंत देशात 51321 ऑक्सिजन सपोर्ट असणारे बेड तयार होते. मंत्र्यांच्या बैठकीत सांगण्यात आले की 9 जुलै पर्यंत त्यांची संख्या 1.42 लाख करण्यात येईल. जेव्हा रक्तातील ऑक्सिजनची पातळी 92-96% ने कमी होते तेव्हा डॉक्टर सतर्क होतात. ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी रुग्णाला पालथे झोपवण्यात येते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like