‘कोरोना’ वॅक्सीन रिसर्चचे पहिले ‘स्कँडल’, भारताच्या ‘संजीवनी’साठी संकट बनले 3 इंडियन रिसर्चर्स ?

लंडन : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनचा शोध लावण्याच्या वृत्तांच्या दरम्यान कोरोना काळातील पहिले रिसर्च स्कँडल समोर आले आहे, ज्याने संपूर्ण जगाला हैराण केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना व्हायरस उपचारासाठी मलेरियाचे औषध ड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या ट्रायलवर मागच्या आठवड्यात प्रतिबंध लावला होता. डब्ल्यूएचओने हे पाऊल प्रतिष्ठित मॅगझिन द लॅन्सेटच्या ज्या अभ्यासावरून उचलले होते, आता त्याच्याकडे कोरोना काळातील सर्वात मोठे रिसर्च स्कँडल म्हणून पाहिले जात आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या स्कँडलमध्ये भारताच्या संजीवनी साठी 3 इंडियन रिसर्चर्ससुद्धा संकट बनल्याचे दिसत आहे.

आता हा स्टडी परत घेण्यात आला आहे, कारण यामध्ये वापरत आलेल्या डेटाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या स्टडीचे लेखक सपन देसाई, मंदीप मेहरा आणि अमित पटेल यांनी आपला आणखी एक पेपरमध्ये सुद्धा मागे घेतला आहे, जो द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाला होता. प्रसिद्ध जर्नल सायन्स साठी चार्ल्स पिलर आणि केली सरविक यांच्या एका रिपोर्टनुसार या रिसर्चर्सने सपन देसाईची शिकागोची कंपनी सर्जीफिएरकडून हॉस्पिटलांचा डेटा घेतला होता. जेव्हा लॅन्सेटमध्ये स्टडी छापला गेला तेव्हा या डेटाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले, तेव्हा त्याचा इंडिपेंडेंट रिव्ह्यू सुरू करण्यात आला, परंतु कंपनीच्या नियमानुसार रिव्ह्यूसाठी डेटा दिला गेला नाही. गोपनियता आणि क्लाएंट अ‍ॅग्रीमेंटचा हवाला देत क्लाएंट कॉन्ट्रॅक्ट आणि ऑडिट रिपोर्ट रिव्ह्यूसाठी सर्व्हरला दिला गेला नाही. यासाठी ज्या डेटाच्या आधारावर तिघांनी पेपर पब्लिश केले होते, त्याची वैधताच आमान्य झाली आणि तिघांनी पेपर परत घेत असल्याची घोषणा केली.

देसाई, पटेल आणि मेहरा यांच्याशिवाय ज्यूरिकच्या युनिव्हर्सिटीचे फ्रँक रूशिजकासुद्धा या स्टडीचे लेखक होते. यामध्ये दावा करण्यात आला होता की, मर्कोलाईडशिवाय किंवा त्याच्या सोबत क्लोरोक्वीन आणि एचसीक्यूच्या वापराने कोविड-19 रूग्णांचा मृत्यूदर वाढतो. संशोधकांनी कोरोना व्हायरसने संक्रमित 96000 रूग्णांनी सहभागी करून घेतल्याचा दावा केला होता. त्यांनी म्हटले होेते की, संक्रमित लोकांमधील 15000 जणांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्वीन औषध अँटीबायोटीकसोबत आणि त्याच्याशिवाय देण्यात आले. ज्याच्या आधारे दावा करण्यात आला की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्वीन औषध घेणार्‍या रूग्णांमध्ये मृत्यूदर जास्त दिसून आला. एनईजेएममध्ये प्रसिद्ध अभ्यासात सुद्धा सर्जीफिएरच्या डेटाचा वापर करण्यात आला होता. यानुसार ब्लड प्रेशरसाठी काही खास औषधे घेतल्याने कोविड-19 रूग्णांमध्ये मृत्यूचा धोका वाढत नाही, ज्याबाबत शंका अगोदरच्या पेपर्समध्ये व्यक्त करण्यात आली होती.

हे सुद्धा मेहरा, पटेल आणि देसाई यांच्यासह बेलर कॉलेज ऑफ मेडिसिनचे श्रेराम कुई आणि सिनसिनाटीच्या क्राइस्ट हॉस्पिटलचे टिमोथी हेनरी यांनी परत घेतले. माफीनाम्यात म्हटले की, प्रायमरी डेटा लेखकांना दिला गेला नाही आणि रिव्ह्यूसाठी सुद्धा दिला गेला नाही. यासाठी त्यास वैध म्हणता येणार नाही. एवढेच नव्हे, सर्जीफिएर च्या डेटाच्या अधारे एक तिसरा पेपरसुद्धा मेहरा, पटेल आणि देसाई यांनी दुसर्‍या लेखकांसोबत मिळून ऑनलाईन प्री-प्रिंट म्हणून छापला होता. यामध्ये आयव्हरमेसटीन नावाच्या अँटी-पॅरासिटीक औषधाने कोविड-19 मुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा दावा केला होता. यानंतर लॅटिन अमेरिकेच्या अनेक देशांनी या औषधाला मंजूरी दिली होती. मात्र, लॅन्सेटच्या पेपरनंतर सर्जीफिएरच्या डेटावर प्रश्न उपस्थित होऊ लागेल.