…तो पर्यंत कोणी मायेचा लाल महाविकास सरकार पाडू शकणार नाही – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit pawar. )  आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडले असे वक्तव्य केल होत. त्या वक्तव्यावरून आता अजित पवार ( Ajit pawar. ) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. अजित पवार ( Ajit pawar. ) यांनी आपल्या नेहमीच्या भाषा शैलीत चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले असून ‘कितीदा सांगायचं की हे तीन नेते जो पर्यंत एकत्र आहेत.

तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही असे त्यांनी म्हंटले आहे.
पुण्यात ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील म्हणतात की, मी बोलायला फटकळ आहे.
अमके आहे, तमके आहे. ते मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्या नादी न लागलेल बर.
आपल दुरुन डोंगर साजरे, असे म्हणत मी वाटच पाहतोय सरकार कधी पडतंय.
झोपेतून उठलो की पडल का काय सरकार अस वाटत त्यामुळे लगेच टीव्ही लावतो मग, काय हे चॅनेल लाव ते चॅलेन लाव अशा शब्दात चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.
मला फक्त एकच सांगायच आहे की, तीन नेते जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत हे सरकार कधीही पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

वारीसाठी स्वतंत्र कमिटी
गेल्या वर्षीही आषाढी वारी झाली नव्हती.
मात्र, यावर्षी वारी व्हावी अशी मागणी वारकरी करू लागले आहेत त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारीसंदर्भातही बैठक घेतली.
त्यामध्ये वारीसंदर्भात एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी संकट टळले नाही. कुंभ मेळ्यानंतर कोरोनाचा ससंर्ग वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. वारीमध्येही असे घडू नये यासाठी पालखी सोहळा घ्यायचा की नाही यासंदर्भात समिती गठीत करण्यात आली असून या कमिटीत विभागीय आयुक्त, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील. ही कमिटी वारीसंदर्भात निर्णय घेईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. असेही अजित पवार यांनी सांगितले.

‘नागिन-3’ फेम पर्ल व्ही पुरीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

मोदी सरकार LIC बाबत घेणार मोठा निर्णय ! मेगा IPO संदर्भातील हालचालींना वेग

राज-उद्धव’ एकत्र येणार ?, खा. संजय राऊतांचे सूचक वक्तव्य