इंटरनेट जगतात खळबळ; तब्बल 77 कोटी 30 लाख ईमेल आयडी हॅक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्याच्या काळात अधिकाधिक लोक, कंपन्या, व्यापारी आपल्या व्यापारासाठी ईमेलचा वापर करतात. त्यात आपल्या अंत्यत वैयक्तिक माहिती असू शकते. तर एखाद्या कंपन्यांचे काही सिक्रेट असू शकतात. हाच डाटा लिक झाला तर हो… कल्पनाच करवत नाही ना. इंटरनेट जगतात एक खळबळ माजवणारी बातमी आली आहे. ही बातमी ‘ट्रॉय हंट’ या ऑस्ट्रेलियन वेब सिक्युरिटी एक्सपर्टने प्रसिद्ध केली आहे. तब्बल 77 कोटी 30 लाख ईमेल आयडी आणि 2कोटींहून अधिक पासवर्डचा डेटा लीक झाल्याचा खळबळजनक दावा ट्रॉय हंटने आपल्या वेबसाईटवरून दिला आहे.

ट्रॉय हंटच्या बातमीतील आकडेवारीनुसार, एकूण 772,904,991 ईमेल आयडी आणि एकूण  21,222,975 पासवर्ड लीक झाले आहेत. हा डेटा जगातील वेगवेगळ्या युजर्सकडून चोरण्यात आल्याचंही वृत्त यात देण्यात आले आहे.

हॅक ईमेल आयडी पैकी एक तुमचा तर नाही ना ?

चेक करा..

तुमचा ईमेल आयडी किंवा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही, हे तुम्हाला सुद्धा चेक करता येईल. त्यासाठी ‘ट्रॉय हंट’ने एक वेबसाईट दिली आहे. ‘Have I Been Pwned’ असे वेबसाईटचे नाव आहे. यावर तुम्ही क्लिक करुन, तिथे दिलेल्या रकान्यात तुमचा ईमेल आयडी टाईप करा आणि त्यानंतर ईमेल आयडी हॅक झालंय की नाही, ते लगेच कळेलं.

जर ईमेल आयडी सुरक्षित असेल, तर ‘Good news—- no pwnage found!’ असं लिहिलेले दिसेल. जर ईमेल आयडी हॅक झालं असेल, तर ‘Oh no—pwned’ लिहिलेलं दिसेल. जर तुमचा आयडी सुरक्षित नसेल तर तातडीने पासवर्ड आणि त्याच्या संबंधित डिटेल्स अपडेट करुन घ्या.