दीपिका पादुकोणनं शेअर करताच ‘व्हायरल’ झाला फोटो, लोक म्हणाले- ‘खुशखबरी आहे का ?’


पोलिसनामा ऑनलाइन –
बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण सध्या पती रणवीर सिंग सोबत टाईम स्पेंड करत आहे. अलीकडेच दीपिकानं चाहत्यांसोबत असा फोटो शेअर केला ज्यानंतर चाहत्यांनी तिला एकच प्रश्न विचारला आहे. सध्या तिच्या या फोटोची आणि चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सोशलवर खूप चर्चा होताना दिसत आहे.

दीपिकानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात कैऱ्याच्या फोडी दिसत आहेत. त्यावर तिनं मिरचीची पूडही टाकली आहे. फोटो शेअर करताना दीपिका म्हणते, “इतर सर्वांच्या तुलनेत तूच फक्त चांगला आहेस ज्यांना मी भेटले आहे.” हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिला एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली.

https://www.instagram.com/p/B_t33A_DmF9/?utm_source=ig_embed

एकानं म्हटलं की, दीपिका प्रेग्नंट आहे का. एकजण म्हणाला, खुशखबरीची तयारी करा. याशिवाय इतरही काहींनी कमेंट केली आहे की, दीपिका काही गुड न्यूज देणार आहे का. सध्या दीपिकाचा हा फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत.

https://www.instagram.com/p/B9iyA9UjNP8/

https://www.instagram.com/p/B9ix_W9jh2G/

https://www.instagram.com/p/B9ix9kUjrpc/

https://www.instagram.com/p/B9gJgmiD7kG/

https://www.instagram.com/p/B9gJbmHjmuv/

https://www.instagram.com/p/B9Y5hXejh76/

https://www.instagram.com/p/B9Y5dnJjLxQ/