Talegaon News : प्रेमसंबंधाची माहिती देताच मित्रांनी केली बेदम मारहाण

तळेगाव दाभाडे/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मित्रांना सांगत असताना मित्रांनीच लोखंडी कलथ्याने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.12) दुपारी एकच्या सुमारास सोमाटणे-परंदवडी रोडवर घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आकाश श्रीरंग साळुंखे (वय-23 रा. चौराईनगर, सोमाटणे फाटे, ता. मावळ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केतन दत्तात्रय पोकळे, चेतन दत्तात्रय पोकळे, निखिल दत्तात्रय पोकळे (रा. चोराईनगर, सोमाटणे फाटा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश साळुंखे हा आपल्या मित्रांना एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगत होता. त्यावेळी केतन पोकळे आणि आकाश साळुंखे यांच्यात वाद झाले. याच वादातून आरोपींनी आकाशला हाताने, दगडाने आणि लोखंडी कलथ्याने बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादीचा भाऊ प्रकाश साळुखे याला देखील मारहाण केली. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. पुढील तपास तळेगाव पोलिस करत आहेत.