गुजरातमध्ये ओवेसी देणार भाजपला आव्हान ! ‘या’ पक्षासोबत करणार युती

गांधीनगर : वृत्तसंस्था –   गुजरातमधील आगामी स्थानिक निवडणुकांसाठी आता भारतीय ट्रायबल पार्टी (Bharatiya Tribal Party – BTP) आणि एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) एकत्रे आले आहेत. दोन्ही पक्षांनी आता एकत्रित निवडणुका लढवण्याचं ठरवलं आहे. बीटीपी आमदार छोटूभाई वसावा (Chhotubhai Vasava) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

वसावा म्हणाले, बीटीपी आणि एमआयएम संविधान वाचवण्यासाठी एकत्रितपणे राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. येथे फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत.

पुढं बोलताना वसावा म्हणाले, BTP आणि AIMIM गुजरातमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत. तसेच चांगल्या भविष्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही हटवण्यासाठी जनतेला काम करावं लागेल. बीटीपीला राजस्थानमध्ये धोका मिळाला कारण तेथे बीटीपीला दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आले होते. ओवेसी यांना आपण गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी बोलवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ओवीसींकडून अद्याप मात्र यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. बीटीपीचे पूर्ण गुजरातमध्ये फक्त 2 आमदार आहेत. त्यापैकी एक छोटू वसावा आणि दुसरा त्यांचाच मुलगा आहे. बीटीपीचे रास्थानातही दोन आमदार आहेत. वसावा यापूर्वी जेडीयुत होते.