अमित शाह ‘गृहमंत्री’आहेत, ‘देव’ नाहीत : ओवैसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत NIA ला  ताकद देणारे संशोधन विधेयक सादर करण्यात आले. यावेळी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध केला. या दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी त्यांना खडे बोल सुनवले, शाह ओवैसी म्हणाले की तुम्हाला ऐकावेच लागेल.

अमित शाह देव नाहीत –

लोकसभेत विधेयक सादरीकरणानंतर ओवैसी यांनी सांगितले की, जे कोणी भाजपच्या निर्णयांचे समर्थन करत नाही, त्यांना देशद्रोही ठरवण्यात येते. त्यांनी काय देशद्रोह्यांचे दुकान खोलले आहे का? ते म्हणाले की, अमित शाह यांनी मला धमकी दिली, परंतू ते फक्त गृहमंत्री आहे, कोणी देव नाहीत. त्यांनी आधी नियम वाचावेत.

NIA संशोधन विधेयक जेव्हा सोमवारी लोकसभेत चर्चा सुरु झाली, तेव्हा मुंबई पोलीसचे माजी कमिश्नर आणि भाजप खासदार सत्यपाल सिंह यांनी सांगितले की, हैद्रबाद स्फोटात जेव्हा पोलिसांनी काही अल्पसंख्याक समाजातील संशयितांना पकडले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कमिश्नरला सांगितले की, असे करु नका नाहीतर तुमची नोकरी जाईल.

शाहांनी खडसवले ओवैसींना –

भाजप खासदारांच्या या वक्तव्यानंतर ओवैसीनी विरोध केला. जसे ओवैसी यांनी बोलण्यास सुरुवात केली तसे गृहमंत्री अमित शाह उभे राहिले आणि ते म्हणाले की, ओवैसी साहेब तुम्ही ऐकायची ताकद ठेवा, जेव्हा  राजा बोलत आहेत. तेव्हा तुम्ही मध्ये का बोलत आहेत. असे चालणार नाही. यानंतर संसदेत गोंधळ सुरु झाला.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या