Asaduddin Owaisi Remarks On Gyanvapi Survey | ‘बाबरी’ हिसकावली, ‘ज्ञानवापी’ हिसकावू शकणार नाही – असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Asaduddin Owaisi Remarks On Gyanvapi Survey | एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Mosque) प्रकरणी भाष्य करत इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसी (Varanasi) येथे आज ज्ञानवापी मशीद परिसरात सर्व्हे झाला. यावर एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी म्हणाले, बाबरी (Babri) हिसकावली, पण ज्ञानवापी हिसकावू शकणार नाही. ज्ञानवापी मशीद होती आणि राहील. (Asaduddin Owaisi Remarks On Gyanvapi Survey)

 

ओवेसींचा सरकारला इशारा
ओवैसी पुढे म्हणाले की, मी सरकारला सांगतो, आम्ही एक बाबरी मशीद गमावली. आता दुसरी मशीद कदापी गमावणार नाही. तुम्ही न्यायाची हत्या करून आमची मशीद हिसकावली. दुसरी मशीद हिसकावू शकणार नाही, हे लक्षात ठेवा.

 

या मागे मोठा कट – ओवेसी
तत्पूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते की, ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेचा आदेश असंवैधानिक आहे. अशा प्रकारचा आदेश द्यायला नको होता. ही बाबरी मशीद पार्ट-2 ची तयारी आहे. या मागे मोठा कट आहे.

ओवेसी यांनी म्हटले की, आम्ही आमची मशीद वाचवू. आम्ही वाचवू, या तुमच्या म्हणण्यावर, आम्ही विश्वास ठेवणार नाही. तुम्ही वाचवणार नाही. इंशाअल्लाह यावेळी आम्हीच आमची मशीद वाचवू.

 

मी मोठ्या जबाबदारीने बोलतो की, ज्ञानवापी मशीद होती, आहे आणि असेल. 1991 चा कायदा सांगतो,
की 15 ऑगस्ट 1947 रोजी जी मशीद होती ती तशीच राहील. जर त्यात कुणी बदल करायचा प्रयत्न केला,
तर 1991 चा संसदेचा कायदा सांगतो, की त्याच्यावर केस होईल. कारागृहात पाठवले जाईल आणि
न्यायालयाने निर्णय दिला तर त्याला 3 वर्षांची शिक्षा होईल, असे ओवेसी म्हणाले.

 

Web Title :- Asaduddin Owaisi Remarks On Gyanvapi Survey | asaduddin owaisi remarks on gyanvapi survey says you snatched babri but will not gyanvapi mosque was and will be

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; स्मार्ट लायन्स्, ऑक्सिरीच स्मॅशर्स संघांची विजयी कामगिरी !

 

NCP president Sharad Pawar | केतकी चितळेने केलेल्या असभ्य टिकेवर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले…

 

Drinking Cold Water Is Good Or Bad | थंड पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते का? जाणून घ्या