… तर तुम्हालाही मुस्लिम बनवू : ओवेसींचे खळबळजनक वक्तव्य 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
हरियाणा येथील गुरुग्राम मध्ये तिघा जणांनी एका मुस्लिम व्यक्तीला सलूनमध्ये फरफटत नेऊन दाढी काढण्यास भाग पाडल्याची घटना घडली . या घटनेवर  ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी  यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. “मुस्लिमांना दाढी काढायला भाग पाडणाऱ्यांना मुस्लिम बनवू आणि त्यांनाही दाढी ठेवायला लावू ” अशी थेट धमकी दिली आहे.
 [amazon_link asins=’B01IH4PK28′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97a9c049-995e-11e8-b5a4-4504cd1ab49f’]
याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘ज्यांनी कुणी हे कृत्य केले त्यांना सांगू इच्छितो की, आमचा गळा कापला तरी आम्ही मुस्लिम राहू. पण आम्ही तुम्हाला मुस्लिम बनवू आणि दाढी ठेवायला भाग पाडू,’ असे  ओवेसी म्हणाले. दरम्यान, हरयाणातील गुरुग्राममध्ये तिघांनी एका मुस्लिम व्यक्तीला फरफटत सलूनमध्ये नेले आणि तेथे त्याला दाढी काढण्यास भाग पाडल्याची घटना गेल्या गुरुवारी घडली. या घटनेनंतर तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/