गोडसेचे ‘वारसदार’ अजूनही जिवंत, मला कधीही गोळी मारू शकतात : ओवेसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीर बाबत अनेकजण आपल्या आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. देशातील विरोधी पक्ष मात्र मोदींच्या या निर्णयामुळे नाखूष असून केंद्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकाकांडून चांगलाच विरोध होतोय. एम आय एमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणामुळे पाकिस्तानला मदत मिळत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. यावर बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.

ओवेसी म्हणाले, ‘एक दिवस मला कोणीही गोळी मारु शकते. मला खात्री आहे की, नथुराम गोडसेचे वारसदार आहेत, तेच असे करु शकतात. आता सुद्धा नथुराम गोडसेचे वारसदार जिवंत आहेत.’

यावेळी ओवेसी यांनी आसाममध्ये मी जमीन खरेदी करु शकतो का ? असा सवाल केला तसेच मी एक खासदार आहे. मात्र, मला अरुणाचल प्रदेश किंवा लक्षद्विपला जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते असेही ओवेसी यावेळी म्हणाले. सध्या जे जम्मू-काश्मीरसोबत झाले आहे ते नागालँड, मिझोरम, मणिपूर, आसाम आणि हिमाचल प्रदेशातील लोकांसोबत होऊ शकते, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ओवेसी यांनी काश्मीरमध्ये सध्या अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला तसेच सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

आरोग्यविषयक वृत्त –