आसनसोलमध्ये बाबूल सुप्रियो यांचा विजय, सेन यांचा पराभव

आसनसोल : पोलीसनामा ऑनलाईन – प. बंगालमध्ये निवडणूक विविध मुद्यांनी गाजली. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झाल्याने कधी नव्हे तर निवडणूक आयोगाला एक दिवस प्रचार अगोदर थांबवावा लागला. आसनसोल लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले होते. या मतदारसंघात टीएमसीच्या मुनमून सेनआणि भाजपचे बाबूल सुप्रियो यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे बाबूल सुप्रियो विजयी झाले. टीएमसीच्या मुनमून सेन यांचा पराभव झाला.

आसनसोल लोकसभा मतदार संघात अत्यंत तुल्यबळ लढत झाली. या मतदार संघात भाजपचे बाबूल सुप्रियो आणि टीएमसीच्या मुनमून सेन यांनी निवडणूक अत्यंत प्रतिष्टेची केली होती. टीएमसी आणि भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी तगडी प्रचार यंत्रणा राबविली होती.परंतु आसनसोलच्या जनतेनं टीएमसीला कौल न देता भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे भाजपचे बाबूल सुप्रियो विजयी झाले असून टीएमसीच्या मुनमून सेन यांचा पराभव झाला आहे. हाती आलेली आकडेवारी अशी आहे.

उमेदवार पक्ष मिळालेली मतं
बाबूल सुप्रियो भाजप ६,३३,३७८
मुनमून सेन टीएमसी ४,३५,७४१