Asaram Bapu | जेलमध्ये बंद आसाराम एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल, 5 दिवसांपासून आहे ताप

जोधपुर : Asaram Bapu | जोधपुरच्या केंद्रीय कारागृहात (jodhpur central jail) लैंगिक शोषणाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा (life sentence) भोगत असलेल्या आसाराम बापू (Asaram Bapu) ला आज (शनिवार) नियमित तपासणीसाठी जोधपुरच्या एम्स (AIIMS in Jodhpur) मध्ये आणण्यात आले. तपासणीसाठी त्यांना एम्सच्या जनरल आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. (Asaram Bapu in General ICU for investigation).

 

आसारामच्या आरोग्य तपासणीत लिव्हरमध्ये एंजाइम वाढल्याचे आढळून आले. याशिवाय युरिन इन्फेक्शन सुद्धा वाढलेले आढळले, ज्यामुळे मागील 5 दिवसांपासून आसारामला ताप येत होता, हे लक्षात घेऊन एम्सच्या डॉक्टरांच्या टीमने जनरल आयसीयूमध्ये दाखल केले आहे (AIIMS doctors has admitted Asaram to the general ICU). जिथे आसारामच्या आणखी टेस्ट होणार आहेत.

 

आसारामला पुढील 48 तासापर्यंत देखरेखीखाली ठेवले जाईल. आसाराम शनिवारी सकाळी 11 वाजता जेलच्या बाहेर पडण्यापूर्वी त्याच्या भक्तांना माहिती मिळाली, ज्यामुळे एम्स परिसराच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने आसारामचे साधक आणि भक्त जमले होते. या भक्तांना नियंत्रित करण्यासाठी सुरक्षारक्षकांना मोठे प्रयत्न करावे लागले.

 

 

Asaram Bapu ला एम्सच्या ओपीडीत नेण्यात आले.
जिथे युरोलॉजी आणि इतर विभागांशी संबंधीत तपासणी करण्यात आली.
लंग्जमध्ये संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर डॉक्टरांनी दाखल करण्याचा निर्णय घेतला.
कारण संसर्गामुळे आसाराम मागील अनेक दिवसांपासून तापाने पीडित आहे.

 

आसारामला (Asaram Bapu) युरिन इन्फेक्शनसह अनेक समस्या आहेत ज्यांचा उपचार जोधपुर येथील एम्सचे डॉक्टर करत आहेत.
यामुळे आसारामला महिन्यात एक किंवा दोन वेळा तपासणीसाठी नेण्यात येत आहे.

 

Web Title :- Asaram Bapu | jodhpur jailed self styled godman asaram admitted to aiims icu has fever for 5 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा