‘आशा’ प्रतिष्ठानकडून 74 वा स्वातंत्र्य दिन देवदासींच्या मुलांसोबत उत्साहात साजरा

पोलिसनामा ऑनलाइन – ७४ वा स्वातंत्र्य दिन देवदासीच्या मुलांसमवेत आशा प्रतिष्ठान ने उत्साहात साजरा केला. बालगोपाळाच्या चेहऱ्यावरील झळकणारा आनंद हीच आमच्या निस्वार्थ कार्याची पावती आहे. यावेळी मुलांना पौष्टिक आहार पौष्टिकलाडू ,राजगिरा वडी आणि शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले. असे कार्यक्रम सामाजिक अंतर कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

यावेळी पुणे शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमठवलेले मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष पियुशजी शहा,नवनीत मंडळाचे संतोषजी फडतरे,त्वष्ठा कासार मंडळाचे किरणजी शेटे, जय महाराष्ट्र मंडळाचे हनुमानजी शिंदे, किरण कर्णावट, तंबाखू आळी मंडळाचे अभिषेकजी मालपाणी, आशा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजलीताई लोणकर, गणेशभाऊ ठाकर, अंकित राजपूत, सोपान यादव, यश जैन, प्रतीक डांगी, पुरुषोत्तम डांगी उपस्थित होते. किरण कर्णावट यांनी यावेळी आशा प्रतिष्ठानला कै.सुर्यप्रभा कर्णावट यांच्या स्मरणार्थ मदत केली.

यावेळी सर्व मान्यवरांना तुळशी च्या रोपांचे वाटप करुन सन्मान करण्यात आला. शहरातील कोरोनाची पाश्वभूमी पाहता सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कार्यक्रम चे सूत्रसंचालन गणेश ठाकर यांनी केले तर आभार अंजली लोणकर यांनी मानले.