विशेष मुलांच्या हस्ते आशापुरा माता मंदिरात महाआरती !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरासह राज्यातील लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगाधाम- शत्रुंजय मंदीर रस्त्यावरील आशापुरा माता मंदिरात नवरात्री निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन मां आशापुरा माता ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाअंतर्गत आज दुपारी ११ वाजता बिबवेवाडी येथील आधार मूक-बधीर विद्यालयातील १०८ विशेष मुलांच्या हस्ते मातांची विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40f14ea4-ce03-11e8-b4fe-710b4e38eca4′]

आशापुरा माता, महालक्ष्मी माता, अंबा माता, सच्चाई माता, पद्ममावती माता, गणेश मंदिर व सोनाना खेतलाजी मंदिर असलेले हे भव्य मंदिर सुमारे एक एकर जागेत आहे. अतिशय आकर्षक कोरीव काम, प्रसन्न मुद्रा व प्रचंड तेजस्वी मूर्ती असल्यामुळे या भागातील नागरीकांचे हे मंदिर श्रद्धास्थान बनले आहे. या वर्षी नवरात्री निमित्त ट्रस्टच्या वतीने आधार मुक-बधीर विद्यालय बिबवेवाडी येथील विशेष मुलांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन केले होते. यावेळी या शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थांला शैक्षणीक साहित्य व खाऊचे वाटप ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलताना ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी यांनी सांगितले की या लहान मुलांना आपण कोठेही कमी नाही, आपल्यालाही समाजात ईतराप्रमाणेच मना-सन्मान मिळतो हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा व तेही या समजाचे घटकच आहेत ही भावना निर्माण व्हावी या उद्देशाने आम्ही त्यांच्या हस्ते या महाआरतीचे आयोजन केले होते. या मंदिराला उद्योगपती अतुल चोरडिया,अमित लुंकड,राजेश सांकला, अविनाश चोरडिया, इंदर छाजेड, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी या दोन दिवसात भेटी दिल्या.

नांदेड येथे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन वेळी शाहू महाराजाचे वंशज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज नांदेड येथे येणार

उद्या १३ तारखेला १ हजार ८ मुलांचे ” श्री सुप्त पठन” होणार आहे. तर १५ तारखेला समाजातील ९ विशेष पदावर काम करणाऱ्या महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे. १६ तारखेला पालिकेच्या सफाई कामगारांचा सन्मान होणार आहे. १७ तारखेला “कन्या पुजन” होणार आहे. अशी माहिती मंदिराचे प्रमुख विजय भंडारी यांनी दिली. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विमल भंडारी,विजय भंडारी,अनिल गेलडा,चेतन भंडारी,अशोक भंडारी,गौतम गेलडा, शशीकांत भंडारी,मंगेश कटारीया,बाळासाहेब बोरा,पंकज कर्नावट,हितेश लोढा यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.

[amazon_link asins=’B073379LZ1,B075ZW7C9S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9ef6b7bc-ce04-11e8-ad73-eda0adffe3e1′]