ऑस्ट्रेलियाच्या ‘स्मिथ’लाच्या मानेवर लागला ‘आर्चर’चा बाऊंन्सर, खेळपट्टीवर कोसळला (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु असेलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रिलीयातील कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी इंग्लंडचा फास्ट गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा एक चेंडू बॅटिंग करत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या मानेवर लागला. चेंडू मानेवर लागताच स्मिथ धाडकन खेळपट्टीवर कोसळला. यामुळे सर्वच खेळाडू चिंतेत पडले.

आर्चर ने फेकलेला तो चेंडू स्मिथच्या थेट कानाखाली मानेवर लागला आणि स्मिथ मैदानावर पडल्याचे पाहून सर्वच खेळाडूंचा थरकाप उडाला. थोड्याच वेळात रिटायर हर्ट होऊन स्मिथने पॅव्हेलिअनचा रस्ता धरला.

स्मिथ आपल्या तिसऱ्या एशेज शतकाच्या जवळ पोहचला होता. ८० च्या धावसंख्येवर खेळत असताना आर्चर ने टाकलेला १४८ किलोमीटर प्रति ताशी वेगाचा चेंडू येऊन थेट स्मिथच्या मानेवर लागला आणि क्षणार्थात इतर सर्व खेळाडू स्मिथच्या आसपास येऊन जमले.

स्मिथने ज्यावेळी मैदान सोडले त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोर सहा आऊट २०३ रण इतका होता. मैदानाबाहेर जाताना प्रेक्षकांनी स्मिथला उभे राहत टाळ्या वाजवून अभिवादन केले. पहिल्या कसोटीच्या दोनीही इनींगमध्ये स्मिथ ने जोरदार शतकी खेळी केली होती.

स्मिथ सलग एशेजच्याच्या सात इनिंगमध्ये ५० पेक्षा अधिक धावा बनवणारा खेळाडू बनला आहे. या आधीच्या कसोटी मध्ये स्मिथने पहिल्या इनींगमध्ये १४४ तर दुसऱ्या इनींगमध्ये १४२ धावा बनवल्या होत्या आणि यामुळेच ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला २५१ धावानी पराभूत केले होते.

Loading...
You might also like