स्मिथनं द्विशतक करत मोडला तेंडुलकर आणि गावस्कर यांचा ‘हा’ विक्रम !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत शेवटच्या आणि चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ याच्या दमदार द्विशतकाच्या जोरावर 500 धावांचा टप्पा ओलांडला. त्याच्या या द्विशतकासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मजबूत धावसंख्या उभारली आहे. त्याने या द्विशतकाच्या बळावर अनेक विक्रमांना देखील गवसणी घातली आहे.

या सामन्यात त्याने झळकावलेलं हे त्याचे 26 वे कसोटी शतक आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या या शतकी खेळीसह अनेक दिग्गजांचे विक्रम मागे टाकले. यामध्ये त्याने सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर तसेच मॅथ्यू हेडन यांचे देखील विक्रम मोडले. सर्वात कमी डावात 26 शतके झळकावण्याच्या बाबतीत तो या दिग्गज फलंदाजांच्या पुढे गेला आहे. या यादीत तो आता दुसऱ्या स्थानी पोहोचला असून त्याने 121 डावांत 26 शतके झळकावली आहेत. तर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांना हि कामगिरी करण्यासाठी 136 आणि 144 डावांमध्ये फलंदाजी करावी लागली होती.

दरम्यान, या कामगिरीसह त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली याला देखील कसोटी शतकांच्या बाबतीत मागे टाकले असून विराट कोहलीच्या नावावर 25 कसोटी शतके असून स्मिथ आता 26 शतकांचा मानकरी झाला आहे. त्याचबरोबर नुकतेच त्याने कसोटी क्रमवारीत देखील विराट कोहली याला मागे टाकत पहिले स्थान पटकावले होते.

आरोग्यविषयक वृत्त –