पैसे संपल्यानं हॉस्पिटलमधून घरी आले ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेते आशिष रॉय, कसंतरी भरलं 2 लाखांचं बिल ! आणखी 2 महिने उपचारांची गरज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ससुराल सिमर का फेम आशिष रॉय यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आशिष आयसीयुमध्ये होते. त्यांची स्थिती खूप गंभीर होती. त्यांच्या शरीरात जवळपास 9 लिटर पाणी जमा झालं होतं. अनेक अवयव सुजले होते. कोरोनामुळं कोणतंही हॉस्पिटल त्यांना अॅडमिट करून घ्यायला तयार नव्हतं. खूप विनंती केल्यानंतर एका हॉस्पिटलनं भरती करून घेतलं. त्यांचं डायलिसिस सुरू होतं. त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी मित्र आणि चाहत्यांकडे आर्थिक मदत मागितली होती.

दिल्लीच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या खात्यात पैसे टाकले होते. परंतु ते गरजेपेक्षा कमी होते. त्यांनी मदतीसाठी मित्र सूरज थापर आणि सलमान खानपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न केला. अद्याप त्यांना मदत न मिळाल्यानं ते हॉस्पिटलमधून घरी आले आहेत.

हाऊस हेल्पर घेतोय आशिषची काळजी

आशिष रॉय सध्या त्यांच्या घरी आहेत. सध्या त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. घरात त्यांची मदत करण्यासाठी हाऊस हेल्पर आहे जो त्यांची काळजी घेत आहे. फ्लाईट नीट सुरू न झाल्यानं आशिषची बहिण त्यांच्याकडे पोहोचू शकलेली नाही.

म्हणून घेतला डिस्चार्ज

पैशांची चणचण असल्यानं आशिष रॉय यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घ्यावा लागला. त्यांचं बिल 2 लाख रुपये झालं होतं. पैसे संपल्यानं ते घरी आले. कसं तरी करून त्यांनी बिल दिलं आहे. परंतु आणखी 2 महिने त्यांच्यावर उपचार सुरू राहणार आहेत. एका दिवसाआड ते हॉस्पिटलमध्ये जातात. 3 तासांच्या डायलिसिससाठी त्यांना 2000 हजार रुपये द्यावे लागतात.