‘अशी ही आशिकी’ चित्रपटात कोण असणार अभिनय बेर्डेची हिरोईन ?

मुंबई : वृत्तसंस्था –  सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात यंग, टॅलेंटेड अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. पण अभिनयची हिरोईन कोण हे अजूनही सिक्रेट आहे जे लवकरच रिव्हिल होणार आहे.
हा मराठी चित्रपट येत्या नव्या वर्षात १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंनटाईन डे ला प्रदर्शित होणार आहे. गेल्यावर्षी सचिनजी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रिटर्न गिफ्ट म्हणून या चित्रपटाची अनाऊंसमेंट केली होती. ‘अशी ही आशिकी’ हा चित्रपट अनेक कारणांसाठी स्पेशल ठरणार आहे. जसे की, या चित्रपटाचे रोमँटिक टायटल, गोष्ट, सचिनजी यांचे जवळपास ५ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शन, स्टारकास्ट, लोकेशन्स इत्यादी.
नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले आहे. मात्र टीझर पोस्टरमध्ये हिरोईनचा चेहरा पूर्णपणे दाखवण्यात न आल्यामुळे कोण असेल सचिनजींच्या चित्रपटाची हिरोईन याचे अनेक अंदाज बांधले जात आहेत. या टीझर पोस्टरने प्रेक्षकांना प्रेमाने टीझकरुन प्रेक्षकांची चित्रपटासाठी असलेली एक्ससाईटमेंट वाढवणार हे नक्की.
गुलशन कुमार प्रस्तुत ‘अशी ही आशिकी’ची निर्मिती टी-सिरीजचे भूषन कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या चित्रपटाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुध्दा या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शनासोबत सचिनजी यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर कथा-पटकथा-संवाद देखील सचिनजी यांनीच लिहिले आहेत.