‘रिंकल्स’, ‘पिंपल्स’ घालवण्यासाठी तसेच गोर्‍या रंगासाठी ‘या’ पध्दतीनं करा ‘ग्रीन टी’चा वापर, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन – आपल्याला हे माहित आहे की, सकाळी एक कप ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अँटी-ऑक्सिडेंट्स आणि पोषक द्रव्यांसह समृद्ध, ग्रीन टी आपल्या शरीराची हानी होण्यापासून संरक्षण करून आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि इतकेच नव्हे तर त्वचेच्या समस्याही दूर करते. मुरुम, सुरकुत्या काढून टाकण्याबरोबरच ग्रीन टी गोरा रंग मिळवण्यासाठी देखील उपयोगी आहे. तर त्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया…

गोरा रंग मिळवण्यासाठी
वापरलेल्या ग्रीन टीच्या २ बॅग्स घ्या. अर्धा कप पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. आता या ग्रीन टीमध्ये १ चमचा मध आणि २-३ थेंब लिंबाचा रस घालून चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनंतर ते कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हे करा आणि थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक दिसून येईल.

पिंपल्ससाठी
ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरिया घटक मुरुमांच्या समस्येपासून दूर करतात. यासाठी ग्रीन टी ची एक बॅग घ्या आणि अर्धा कप पाण्यात चांगले उकळा. थंड झाल्यावर ते कॉटन बॉलच्या सहाय्याने चेहऱ्यावर आणि मुरुमांवर लावा. कोरडे झाल्यावर धुवा. दिवसातून दोनदा असे केल्याने मुरुम फार लवकर जातील.

मोठ्या छिद्र आणि तेलकट त्वचेसाठी
त्यामध्ये असणारे टॅनिन केवळ मोठ्या छिद्रांना कमी करत नाही, तर ते सीबम प्रॉडक्शनवर नियंत्रण ठेवून तेलकट त्वचेची समस्या देखील दूर करते. फक्त अर्धा कप पाण्यात एक ग्रीन टी उकळा आणि थंड होऊ द्या. आता ३ चमचा ग्रीन टी घ्या आणि त्यात ३ चमचे तांदळाचे पीठ आणि १ चमचे लिंबाचा रस मिसळून सॉफ्ट पेस्ट तयार करा. ते आपल्या चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर धुवा. आठवड्यातून एक किंवा दोनदा हे करा. संवेदनशील त्वचा असणारे वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट घ्या.

सुरकुत्यांसाठी
त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि मिनरल्स वृद्धत्वाच्या खुणा घालवतात. यासाठी दोन ग्रीन टी घ्या आणि अर्धा कप पाण्यात उकळा. ते थंड होऊ द्या. आता दोन चमचे ग्रीन टीच्या या पाण्यात चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा आणि कॉटनने चेहर्‍यावर लावा आणि हलके मसाज करा. १० मिनिटांनी ते धुवा. आठवड्यातून दोनदा ते वापरा. संवेदनशील त्वचा असेल तर प्रथम पॅच टेस्ट घ्या. लिंबामुळे तुम्हाला रॅशेस उठू शकतात.