30 वर्षानंतर कपिलच्या शोमध्ये दिसली ‘आशिकी’ची ‘स्टारकास्ट’, ‘एवढे’ बदललेत की ओळखणं देखील ‘मुश्कील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 90 च्या दशकातील चित्रपट ‘आशिकी’विषयी बोलायचे म्हणले फक्त हा चित्रपट नाही तर यातील सर्व गाणीही सुपरहिट झाली होती. आशिकीला रिलीज होऊन 30 वर्षे झाली आहेत. अशामध्ये चित्रपटाचे संपूर्ण स्टारकास्ट कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले होते.

या चित्रपटात राहुल रॉय, अनु अग्रवाल आणि दीपक तिजोरी मुख्य भूमिकेत होते. ‘आशिकी’मधील भूमिकेमुळे हे कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. कपिलच्या शोमध्ये पोहचलेल्या राहुल रॉयने आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहे. सेटवर अर्चना पूरन सिंगसोबत त्यांनी फोटो काढले आहे.

कपिल शर्माच्या शोमध्ये राहुल रॉय, अनु अग्रवाल आणि दीपक तिजोरी यांनी खूप मस्ती केली. यासोबतच त्यांनी जुन्या आठवणींचे काही किस्से शेअर केले. राहुल रॉयने आशिकीमधील गाणेसुद्धा गायले. आता या एपिसोडची शुटिंग पुर्ण केली गेली आहे. याचे प्रसारण काही दिवसातच प्रेक्षकांना पहायला मिळेल.

https://www.instagram.com/p/B8CR735JnKV/

या शोमध्ये राहुल रॉय आणि दीपिक तिजोरी यांच्यात जबरदस्त बॉन्डिंग पाहिला मिळाली. राहुल रॉयने हे पाहताच दीपिक तिजोरीला किस केले. राहुल रॉय याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘कपिलच्या शो वर 30 वर्षांनंतर ‘आशिकी’.

30 वर्षांत सर्व कलाकारांचा लूक पूर्णपणे बदलला आहे. राहुल रॉय आणि दीपक तिजोरीची दाढी पांढरी झाली आहे. त्याच वेळी, अनु अग्रवाल बर्‍याच दिवसांनंतर पब्लिकली दिसल्या. एकदा त्यांना पाहिल्यावर त्यांची ओळख पटवणे कठीण आहे. चित्रपट ‘आशिकी’ चे दिग्दर्शक महेश भट्ट होते. याची निर्मिती गुलशन कुमार आणि मुकेश भट्ट यांनी केली आहे.