Ashish Chandarana | म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी आशिष चंदाराणा यांची नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ashish Chandarana | राज्याच्या विद्युत क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते व अकोला येथील विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे (Nag Vidarbha Chamber of Commerce) वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष चंदाराणा (Ashish Chandarana) यांची म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दि. १ एप्रिलपासून लागू होईल.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सूत्रधारी कंपनीच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये श्री चंदाराणा यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला.

चंदाराणा यांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वीज क्षेत्राबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मागील २५ वर्षापासून विविध ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाद्वारे वीजदराबाबत होणाऱ्या अनेक सुनावण्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच मा. आयोगाने त्यांना ग्राहक प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा वीज क्षेत्राचा विशेष अभ्यास आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या कामासाठी त्यांना अकोला जिल्ह्याचा वर्ष २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देख़ील मिळाला आहे.

अकोला येथील रहिवासी असलेले श्री चंदाराणा यांनी वर्ष १९९५ मध्ये अमरावती विद्यापीठातून बी.एस.सी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सूरू केला. श्री चंदाराणा हे अमरावती विभागातील लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष आहेत.

म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी विश्वास पाठक (Vishwas Pathak) यापूर्वीच कार्यरत असून याखेरीज चंदाराणा यांचीही स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.

Web Title :- Ashish Chandran | Appointment of Ashish Chandarana as Director of M.R.V.M.Sutradhari Company

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ambedkar Jayanti | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती : चैत्यभूमीवरील
सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Congress Leader Rahul Gandhi | लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा धक्का!
‘सरकारी निवारा’ही जाणार

Cricketer Kedar Jadhav’s Father Missing | क्रिकेटर केदार जाधवचे वडिल पुण्यातून बेपत्ता,
पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार

CM Eknath Shinde | ‘सावरकर होण्याची लायकी नाही’, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात;
लवकरच राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ सुरू करणार (व्हिडिओ)

Maharashtra Police – DG Medals | DG पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते
पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्या डीसीपी स्मार्तना पाटील, एसीपी बजरंग देसाई, रूक्मीणी गलांडे,
निवृत्त एसीपी प्रतिभा जोशी, लक्ष्मण बोराटे, व.पो.नि. प्रताप मानकर, वैशाली चांदगुडे यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांचा गौरव