काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, त्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कालच्या राजकीय नाट्यानंतर आता राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता 6 तास शिल्लक आहेत. त्याआधीच काँग्रेसला राज्यपाल आपल्याला देखील सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देतील अशी आशा आहे. त्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांची आहे.

काल शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यास राष्ट्रवादी अनुकूल असल्याचे स्पष्ट असताना काँग्रेसच्या हायकमांडचा त्याला प्रथमदर्शी विरोध दिसत होता. त्यानंतर काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा दिल्याच्या बातम्या समोर येत असताना सत्तेचा तिढा सुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू अखेरच्या क्षणापर्यंत राज्यपालांना द्यावे लागणारे पाठिंब्याचे पत्र काँग्रेसकडून शिवसेनेला पाठवण्यात आले नाही आणि शिवसेना सत्तास्थापनेच्या जवळ जाऊन माघारी फिरली.

या सर्व घडामोडींनंतर राज्यपालांनी तात्काळ तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर राष्ट्रवादींच्या नेत्यांनी राज्यपालांची तात्काळ भेट देखील घेतली परंतू राष्ट्रवादीने सांगितले की आपण काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत आहोत.

त्यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली आहे. आशिष देशमुख म्हणाले की काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने होकार द्यावा. अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी आशिष देशमुख यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे आता सत्तेचा पेच आणखी वाढतो की काय अशी साशंकता उपस्थित केली जात आहे.

Visit : Policenama.com