Ashish Deshmukh | ‘हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे निंदनीय’, काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात आले होते. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूर (Nagpur Winter Session) येथे होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये न होता मुंबईतच घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting) घेण्यात आला. यावर काँग्रेसचे नेते (Congress leader) आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घरचा आहेर दिला आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन न होणे हे निंदनीय असल्याचे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी म्हटले आहे.

 

आशिष देशमुख महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर टीका करताना म्हटले, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे डिसेंबर 2021 मध्ये मुंबईत करण्याचे राज्य सरकारचे (Maharashtra Government) नियोजन असून त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. खरंतर नागपूर कराराप्रमाणे (Nagpur Agreement) हे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे होतं. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे हे अधिवेशन मुंबईत झाले. मागील पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर येणारे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2021 पासून नागपूरला होईल अशी घोषणा करण्यात आली होती. असे असतानादेखील हे अधिवेशन मुंबईत (Mumbai) घेण्यात येत आहे. मुंबई येथे विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायचे असल्यास, अधिवेशनाच्या 45 दिवस आधी नियमानुसार विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन मुंबईच्या अधिवेशनावर शिक्कामोर्तब केले जाते. मात्र तसे काही झालेच नसल्याचे देशमुख (Ashish Deshmukh) म्हणाले.

तर विदर्भाचा विकास होणारच नाही
नागपूर कराराचा सन्मान म्हणून, विदर्भाच्या (Vidarbha) विकासासाठी असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हे हिवाळी अधिवेशन दरवर्षी व्हावे, असा नियम आहे.
विदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाय-योजना काढण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला खूप महत्त्व आहे.
नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन ज्या हेतूसाठी भरवले जाते,
तो हेतू त्यातून पूर्णत्वास जात नसेल तर विदर्भाचा विकास होणारच नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

सरकार विदर्भाप्रती असंवेदनशील
विदर्भातील दोन कोटी जनतेच्या दृष्टीने नागपूरला हे अधिवेशन न होणे, ही निंदनीय बाब आहे.
यावर्षीदेखील हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार नाही.
तेव्हा आता मार्च 22 मधील ‘बजेट अधिवेशन’ (Budget session) किमान 2 महिने नागपूरला घ्यावे
आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने त्यात भरीव अशी तरतूद करुन द्यावी, अन्यथा हे सरकार विदर्भाप्रती असंवेदनशील आहे,
असा जनतेचा समज होईल. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत नसल्याने आम्ही विदर्भीय जनता याचा निषेध करतो,
असा संताप आशिष देशमुख यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Ashish Deshmukh | it reprehensible winter session not held nagpur congresss dr ashish deshmukhs mahavikas aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

World Top Business Family | जाणून घ्या अमेरिकेच्या वॉल्टन कुटुंबाने कशी केली होती ‘गडगंज’ संपत्तीची ‘वाटणी’, तसंच करायचंय रिलायन्सचे मुकेश अंबानी यांना!

HBCSE Recruitment 2021 | होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई इथे भरती; पगार 1,31,000 रुपयापर्यंत, जाणून घ्या

Senior Citizen Saving Scheme | बचत योजनांमधून मिळत असेल लाखो रुपयांचे व्याज, तर जाणून घ्या केव्हा आणि कसे वाचू शकता टॅक्स कपातीपासून