Homeताज्या बातम्याAshish Shelar | 'उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपचा महापौर',...

Ashish Shelar | ‘उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपचा महापौर’, मुंबई प्रदेशाध्यपदाची जबाबदारी स्विकारताच आशिष शेलारांची गर्जना (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Brihanmumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आपल्या नेतृत्वात मोठा बदल करत मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे सोपवली. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जबाबदारी स्विकारताच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील शिवसेनेविरोधात (Shivsena) आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेमधून उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचारी शिवसेनेला तडीपार करुन महापालिकेत भाजपचा महापौर (Mayor of BJP) बसवणार असे शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भ्रष्टाचाराची (Corruption) जी बजबजपुरी केली त्याला तडीपार करण्याचं काम मी आणि माझे सहकारी करणार आहे. आजच सर्व विषयांवर बोलणार नाही. दिवस पावसाचे आहेत. पण वारंवार वर्षानुवर्षे ज्या कंत्राटदारांना पोसलं आणि कंत्राटदारांनी ज्यांना पोसलं ते खड्ड्यांपासून हात झटकू शकत नाहीत. सांडपाणी निविदेत दिरंगाई आणि घोळ यातून सेनेचे नेते हात झटकू शकत नाहीत. निकृष्ट दर्जाचं कोस्टल रोडचे काम (Coastal Road Work), मेट्रो-3 (Metro-3) मध्ये केलेला अहंकार यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड टाकला आहे. त्यापासून शिवसेना हात झटकू शकत नाही, असा टोला शेलार यांनी लगावला.

 

 

खा. अरविंद सावंत यांना ओपन चॅलेंज

भाजपकडून माजी नगरसेवकांना आमिष दाखवून ऑपरेशन लोटस (Operation Lotus) चालवलं जात आहे त्याला बळी पडू नका असे आवाहन शिवसेना खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी केलं आहे. याबाबत शेलार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. अरविंद सावंत यांना माझं ओपन चॅलेंज आहे. त्यांनी आधी स्वत:ची खासदारकी टिकवावी. ज्यावेळी आमचं ऑपरेशन सुरु होईल तेव्हा मुंबईत सर्वात आधी अरविंद सावंत याचं संस्थान खालसा होईल. त्यांनी स्वत:च्या जीवावर येणारी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) जिंकून दाखवावी. त्यांनी आपली खासदारकी टिकवली तरी खूप आहे, असे शेलार म्हणाले.

 

मुंबईत भाजपचा महापौर

ते पुढे म्हणाले, गेल्या 25 वर्षात मुंबईबाबत तुम्ही जे चित्र डोक्यात रंगवलंय, मनात जपलंय ते साकारण्याचं काम भाजपा करेल.
आम्हाला मुंबईकरांचे आशीर्वाद निश्चितच मिळेल. आमचं ठरलंय, भ्रष्ट व्यवस्थेनं बरबटलेल्या
उद्धवजींच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं आहे आणि मुंबईकरांच्या मनातील
स्वप्नातील खऱ्या विकासाच्या मुंबईचे चित्र रंगवून मुंबईकरांना सुपूर्द करायचं आहे.
मुंबई महापालिकेत आमचं टार्गेट हे महापौरपद आहे. त्यासाठी आवश्यक नगरसेवक निवडून आणू,
असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Ashish Shelar | ashish shelar claims that the bjp will install a mayor in mumbai to crack down on uddhav thackerays corrupt shivsena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News