Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”

मुंबई : Ashish Shelar | देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा पुन्हा दणदणीत विजय होणार हे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे आपले कुटुंब सावरण्यासाठी धडपडणारे बरळत आहेत, अशी टीका मुंबई भाजपाचे (BJP) अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटावर (Shiv Sena Thackeray Group) केली आहे. शिवसेनेने आज सामना या मुखपत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेला शेलार यांनी प्रत्युत्तर दिले.

ठाकरे गटावर टीका करताना आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून बडबड करणारे आता भयंकर बिथरले आहेत. मंबाजी-तुंबाजी तर मातोश्रीत शिरलेत…पत्रकार पोपटलाल यापैकी एकाची किंवा प्रसंगी दोघांची भूमिका चोख बजावत आहेत.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुढे म्हटले आहे की, तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्याखालचा अंधार बघा. देव, देश आणि धर्माची चिंता जनता करेल! अजूनही सांगतोय, भोंदूगिरी सोडा आणि जय श्रीराम म्हणा. तरच वाचाल, नाहीतर शिल्लक राहिलात तेसुद्धा संपून जाल!

एकनाथ शिंदे-अजित पवारांवर सामनातून घणाघात…
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीकास्त्र डागताना म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये वैचारिक गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी, त्यांच्याबरोबरचा शिंदे गट (Shinde Group) हा बोगस हिंदुत्ववादी अशा दोघांच्या कात्रीत अजित पवारांचा धर्मनिरपेक्षवादी गट अडकला आहे.

शिंदे गटाने आणि अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) कोणत्या चिन्हावर लढायचे हे दिल्लीतील भाजपा हायकमांड ठरवणार आहे. मुळात कलंकित चेहऱ्यांना, मिरची छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, असे फर्मान सुटले तर शिंदे आणि अजित पवार गटातील ९० टक्के लोक बाद होतील.

स्वत: अजित पवार हे कोणत्याच चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत. कारण, भाजपा आणि त्यांच्याबरोबर
दोन्ही गटांत आतापासूनच धुसफूस सुरू झाली आहे की कलंकित लोकाना उमेदवाऱ्या मिळू नयेत.
उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. भाजपाच्या प्रमुख मंडळींची हीच भूमिका आहे असे वृत्त
संघ परिवारानेच सोडले आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. याच टीकेला शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Thackeray Group | कलंकित, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी न देण्याचे फर्मान सुटले तर शिंदे, अजित पवार गटातील…, शिवसेनेचा घणाघात

Pune Pimpri Chinchwad Crime News | भरधाव दुचाकीची कारला धडक, एकाचा मृत्यू; बाजीराव रोडवरील घटना

Skin Hydration | खाज येण्यापासून ते बारीक रेषांपर्यंत, त्वचेमध्ये पाणी कमी झाल्यास दिसतात ‘हे’ 5 चिन्हे..

Pune Pimpri Chinchwad Crime News | मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण करुन चारचाकी गाडीची तोडफोड, नदीपात्रातील घटना

सिनेस्टाईल पाठलाग, अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात रोड रोमियोंकडून विनयभंग; वारजे माळवाडी परिसरातील घटना

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

अंगावरील कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Ajit Pawar | आता मुलाच्या नावापुढे लागणार आईचे नाव…नंतर वडिलांचे, चौथ्या महिला धोरणाला मंजुरी, अजित पवारांची माहिती