×
Homeताज्या बातम्याAshish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा, तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात...

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा, तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी सरकारने कारवाई…

मुंबई : Ashish Shelar | वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरू होत्या का? खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करत मुंबईतील भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला (Shivsena) कारवाईचा इशारा दिला आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) अडीच वर्षांच्या काळात वेदांत-फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला… हा घ्या सरकारी पुरावा. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरू होत्या का? चौकशी झालीच पाहिजे!

या ट्विटमध्ये शेलार यांनी पुढे म्हटले आहे की, या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी! चौकशीला सामोरे जा… अजून बरेच निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करू नये?

यापूर्वी शेलार यांनी आमची रोखठोक सच्चाई असे म्हणत शिवसेनेला उद्देशून खुले पत्र लिहिले होते. यात बोचरी टीका करताना शेलार यांनी म्हटले होते की, पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली… आयना का बायना… घेतल्याशिवाय जायना असे वागणार्‍यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत… हसीना पारकर सोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा!

Web Title :- Ashish Shelar | bjp ashish shelar slams shivsena aaditya thackeray over vedanta foxconn project

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Joint Pain | नवजीवन वेदनाहर तेल व चुर्ण सांधेदुखीवर रामबाण उपाय, एकदा वापरा सांधेदुखीला करा कायमचा राम राम

Chhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा फोटो का?, ज्यांना पाहिलं नाही, ज्यांनी…, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर भाजपा, ब्राह्मण संघटनांचा आक्षेप

Vitamin D | व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेमुळे वाढू शकतो फॅटी लिव्हरचा धोका, जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News