Ashish Shelar | भाजपामध्ये देखील अंतर्गत वाद? आशिष शेलार अवघ्या 5 मिनिटांमध्ये स्टेजवरून निघाले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Ashish Shelar | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. तेव्हापासून आघाडी सरकारमध्ये काही ना काही कुजबूज सुरू असते. नाराजी दिसून येते. विशेष तर काॅग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद देखील दिसला. वांद्रयातील काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी (Zishan siddiqui) यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याबाबत वरिष्ठाकडे तक्रार केलीय. अशातच आता भाजपमध्ये (BJP) देखील अंतर्गत मतभेद समोर आले आहे. यावरुन भाजपामध्येही अंतर्गत वाद (Ashish Shelar) आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी तर पक्षांनी कंबर कसली आहे.
आज (सोमवारी) वांद्रे येथील मुंबई भाजपच्या (BJP) आंदोलनाच्यावेळी हे प्रकर्षाने समोर दिसून आलं आहे.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांची नाराजी दिसून आली आहे.
शेलार यांनी आंदोलनातून मधूनच बाहेर गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

दरम्यान, आशिष शेलार (MLA Ashish Shelar) हे व्यासपीठावर फक्त 5 मिनिटे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित न करताच ते निघून गेले आहेत.
तसेच मिडियांशी देखील बोलले नाहीत. नांदेड, अमरावती, मालेगाव दंगलीच्या निषेधार्थ वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे.
मागच्या महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे होती.
त्यानंतर आता तीच जबाबदारी अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्याकडे आहे.
यामुळे आशिष शेलार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

 

Web Title : Ashish Shelar | bjp internal dispute mla leader ashish shelar leaves stage mumbai marathi news policenama

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Alia Bhatt-Tara Sutaria | आलिया भट्टची होणारी भावजय तिच्यापेक्षा ‘हॉट’, पाहा तिचे खास फोटो..!

Nawab Malik In Dubai | वानखेडेंवर आरोप करणारे नवाब मलिक अचानकपणे दुबई दौऱ्यावर का गेले? 

Freida Pinto | स्लमडाॅग मिलेनियर फेम फ्रीडा पिंटोला पुत्र रत्न, शेअर केला फोटो