Ashish Shelar | खडसे-अमित शाह यांच्या भेटीवर आशिष शेलारांचे मोठे विधान, म्हणाले… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकनथ खडसे पुन्हा भाजपमध्ये (BJP) येणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अमित शाह जो निर्णय घेतील तो भाजपचा निर्णय असेल, असे आशिष शेलार ( Ashish Shelar) म्हणाले. रंगशारदा (Rang Sharada) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या ऐकीव बातम्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांना आवश्यकता
आणि नियोजनानुसार खडसे यांना वेळ दिली असेल, तर मी त्यावर काय भाष्य करणार? एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर अमित शाह निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा भाजपचा निर्णय असले, अशी भूमिका आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी मांडली आहे.

 

https://www.facebook.com/watch/live/?ref=watch_permalink&v=1806865336347782

 

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी अमित शहांना भेटण्यासाठी गेल्याची माहिती खरी असल्याचे सांगताना
अमित शाह आणि नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबरोबर आपले मागील अनेक वर्षापासून चांगले
वैयक्तीक संबंध आसल्याचे खडसे यांनी सांगितले. अमित शहांना एकदा भेटलो नाही याआधी पण भेटलो आहे.
देवेंद्रजींनाही (Devendra Fadnavis) भेटलो आहे आणि या पुढेही भेटणार आहे. शहांना भेटू नये असा नियम आहे.
हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे संबंध आहेत, असे खडसे यांनी सांगितलं.

Web Title :- Ashish Shelar | BJP leader ashish shelar comment on ncp eknath khase and hp amit shah meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Breast Pain Before Period | मासिक पाळीपूर्वी स्तन दुखण्याचा त्रास होत असेल तर असू शकते ‘हे’ कारण, जाणून घ्या उपचार