Ashish Shelar | भाजपाच्या शेलारांचा शिवसेनेला सवाल, पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ashish Shelar | इतिहासातील खानांची सदैव ‘उचकी‘ लागणारे भाजपाचा (BJP) राजकीय कोथळा काढायला निघालेले… संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे ‘होर्डिंग‘ लावणारे आता पीएफआयवरील (PFI) कारवाईचे समर्थन ही करायला तयार नाहीत… आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत, आता कुठल्या बिळात बसला आहात?, असा सवाल भाजपाचे मुंबईतील नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांना केला आहे.

 

पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector’s Office) शुक्रवारी आंदोलन केले. यावेळी ’पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा दिल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपायुक्त सागर पाटील (Deputy Commissioner of Police Sagar Patil) यांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास सुरू असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत, अशी दिली.

 

पुण्यातील या प्रकरणानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे की, मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणार्‍या…हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणार्‍या…सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमितभाई शाह (Home Minister Amit Shah) यांच्यावर टीका करणारे…उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत?

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे
की, ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावण्याचा कोणालाही अधिकार नाही.
अशी नारेबाजीची गंभीर दखल राज्य सरकारने (State Government) घेतली आहे.
असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गृह विभाग कठोर कारवाई करेल.

 

Web Title :- Ashish Shelar | bjp leader ashish shelar tweeted and directly questioned former chief minister uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

S. Jaishankar | युद्धात भारत कोणाच्या बाजूने?, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एस. जयशंकर यांनी दिले ‘हे’ उत्तर

IND vs ENG | भारताच्या दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच घेतली विकेट

CM Eknath Shinde | ते बंड फसले कारण त्यावेळी अजित पवार होते, यावेळी…, एकनाथ शिंदे यांनी सांगितला फरक