आशिष शेलारांनी मुंबई पोलिका निवडणुकीसाठी शिवसेनेला दिलं ‘आव्हान’, म्हणाले – ‘बंदूक भी तेरी, गोली भी तेरी…भाजप तयार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन भाजप BJP नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. “मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची कटकारस्थानं सुरू आहेत. मुंबई भाजप BJP सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. आपली हार लक्षात घेता शिवसेनेनं निवडणुकीपासून पळवाट काढायची तयारी सुरू केली आहे. कोरोनाचं कारण देऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे”, असा खळबळजनक आरोप आशिष शेलार यांनी यावेळी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोनाच्या नावाखाली अनेक गोष्टी सुरू आहेत. २०११ च्या जनगणेनुसार २०१७ ची प्रभागरचना झाली, मग आता त्याच जनगणनेनुसार २०२२ मध्ये प्रभागरचना का? जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदार नोंदणी करताना जास्त वेळ लागेल, असा त्यामागचा डाव आहे. जितकं करता येईल तितकं निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबई महापालिकेतील जे ३० वॉर्ड आपण कधीच जिंकू शकत नाही अशा वॉर्डला टार्गेट करुन तिथं फोडाफोडी करण्याचा डाव शिवसेनेनं आखला आहे, असंही शेलार म्हणाले. याशिवाय जनगणनेचं कारण देऊन मुंबईतील वॉर्ड रचना बदलण्याचं कारस्थान सत्ताधारी शिवसेनेकडून रचलं जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

याशिवाय, कोरोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक आयोगानं ठरवलं आणि निवडणूक वेळेतच घेतली तरी भाजप पूर्ण तयार आहे हे सांगताना शेलार यांनी बॉलिवूड स्टाइल डायलॉगची आठवण करुन देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सामनामध्ये दररोज डायलॉगबाजी केली जाते. आज आम्हीही शिवसेनेला त्यांच्याच भाषेत सांगतो, बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है”, असं शेलार म्हणाले.

 

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत