‘… ही तर चाकरमान्यांची फसवणूक, परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यास परवानगी मिळणार की नाही याबाबत मागील अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहीली होती. राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागून राहिले होते. आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला तो वरातीमागून घोडं आहे. ही कोकणी माणसाची फसवणूक असल्याची टीका आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा मुद्दा गाजत आहे. कोरोनामुळे प्रवाशांवर क्वारंटाइन होण्याची सक्ती असल्यानं आणि गणेशोत्वाला मोजकेच दिवस शिल्लक असल्याने विरोधकांनी यावरून सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यावरून आशिष शेलार यांनी परब यांच्यावर टिका केली आहे.

आज पासून एसटीचे बुकिंग सुरु होणार असेल तर मग कसा प्रवास होणार ? दहा दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला, तरी ग्रामपंचायतीनं 14 दिवसांचा निर्णय घेतला त्या विषयी शासनाच्या प्रतिनिधींनी स्थानिकांशी चर्चा केली आहे का ? रेल्वे गाड्या सोडण्यास तयार होती मग गाड्या मागण्यात आल्या नाहीत ? एसटीने जाणार त्यांना ई-पास नाही मग खासगी गाडीसाठी का ? शासनाने 10 दिवस क्वारंटाईन असं घोषित केले आणि ग्रामपंचायतीने ते मान्य न केल्यास काय करणार ? आता एकाचवेळी एसटी आणि खाजगी गाड्या रस्त्यावर आल्यास वाहतूक नियोजनाचे काय ? केवळ 250 रुपयात अँटीबॉडी टेस्ट होत असताना चाकरमान्यांच्या या मोफत टेस्ट शासनाने का केल्या नाहीत ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत कोकणातील चाकरमान्यांची कोंडीच शासनाला करायची होती. म्हणून आता वरातीमागून घोड असल्यासारखा निर्णय घेतला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
काय म्हणाले परब ?

एसटीमध्ये 22 लोकांना प्रवास करता येणार असून मुंबईहून थेट गावात प्रवासी जातील. प्रवासादरम्यान गाडी कुठेही थांबणार नाही. जेवण स्वत:चं घेऊन प्रवास करायचा आहे. जेवणासाठी एसटी कुठेही थांबणार नाही. फक्त 2 ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी बस थांबवणार आहे. खासगी बस चालाकांना एसटी पेक्षा दीडपटच दर आकराता येणार आहे. नाहीतर कारवाई करण्यात येणार आहे. कोकणवासीयांना 12 ऑगस्टपूर्वी कोकणात पोहचावं लागेल. 12 तारखेला रात्री 12 पर्यंत पोहचतील ते होम क्वारंटाईन होतील. ज्यांना 12 तारखेनंतर जायचे असेल त्यांनी 48 तासांपूर्वी कोविड 19 चाचणी करावी लागेल ती निगेटिव्ह आली तरच त्यांनी कोकणात जावं असाही नियम करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like