Ashish Shelar | ‘आक्रमक भूमिका घेत राहिला तर जीवे मारुन समुद्रात फेकू…’ भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

0
264
Ashish Shelar | death threat to bjp leader ashish shelar complaint on bandra police station
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) आक्रमक नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देण्यात आली आहे. एका निनावी पत्राद्वारे शेलार (Ashish Shelar) यांना ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मारुन समुद्रात फेकू असा मजकूर या पत्रात आहे.

 

काय म्हटलं पत्रात?
या पत्रात आशिष शेलार (Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यात तुम्ही अशीच आक्रमक भूमिका घेत राहिलात तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवे मारुन समुद्रात फेकू अशी धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्या कार्यालयाच्यावतीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे हस्ताक्षर कोणाचं आहे, कोणत्या पोस्ट ऑफिसमधून हे पत्र आले याचा तपास पोलीस करीत आहेत.

 

आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये शुक्रवारी सकाळी हे निनावी पत्र (Anonymous Letter) आले.
या पत्रात आशिष शेलारांसह भाजप आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) विरोधात असभ्य भाषेचा वापर केला आहे.
वांदे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन तपास सुरु केला आहे.

 

Web Title :- Ashish Shelar | death threat to bjp leader ashish shelar complaint on bandra police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | …काका कानाला बोटे लावा; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकोप्यावर बोलताना जयंत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला

Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…

CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे